ताजी बातमी / ऑनलाईन टीम
महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळातर्फे 7 ऑगस्ट विणकर दिनाचे औचित्य साधत इचलकरंजी व परिसरातील वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करणार्या राहुल निमणकर, सौ. ज्योती टेके, सौ मंजुषा वरुटे या युवा उद्योजक तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या श्री चौंडेश्वरी गृहनिर्माण संस्थेस पुरस्कृत करणेत आले. हा पुरस्कार संस्था चेअरमन महेशराव सातपुते व संचालकांनी स्वीकारला. सदर पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांचे कल्पनेतून संपन्न झाला.
7 ऑगस्ट हा राष्ट्रीय विणकर दिन देशभरात उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ मुंबई ही राज्यव्यापी संस्था कोष्टी समाजाच्या प्रगतीसाठी विशेषत: विणकरांच्या उन्नतीसाठी गेली 66 वर्षे असंख्य सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक कला, क्रीडा इत्यादी उपक्रमांच्या माध्यमांतून प्रयत्नशील आहे. यावेळी मार्गदर्शन करताना प्रकाशराव सातपुते यांनी, मंडळाच्या कार्याचा आढावा घेवून कोष्टी समाजाच्या सहकार्याने समाज विकासासाठी कटीबद्ध राहीन, अशी ग्वाही दिली. प्रमुख पाहुणे देवांग समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ मुसळे, चौंडेश्वरी सुतगिरणीचे चेअरमन संजय कांबळे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
याप्रसंगी कोष्टी समाजाचे भूषण विकास खारगे यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य अवर सचिवपदी निवड झालेबद्दल राहुल सातपुते यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यास सर्वांनी टाळ्यांच्या गजरात समंती दिली. या निमित्ताने सर्व सत्कारमूर्तीनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मंडळाचे सचिव मिलिंद कांबळे, सहसचिव दिलीप भंडारे, महिला उपाध्यक्षा सौ. प्राजक्ता होगाडे, रामचंद्र निमणकर, सौ. दीपा सातपुते, गीता भागवत, गिरीश कांबळे, मधुकर वरुटे, राजेंद्र सांगले, प्रमोद मुसळे, विजय मुसळे, प्रशांत सपाटे, आनंदराव साखरे, मुरलीधर निमणकर, अर्जुन दिवटे, मनोहर मुसळे, व मान्यवर तसेच समाजाच्या विविध संस्थांचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कांबळे यांनी केले. आभार रामचंद्र निमणकर यांनी मानले.