Saturday, September 21, 2024
Homeमनोरंजन'या' तारखेला पार पडणार बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले ? प्रेक्षकांनी ठरवली...

‘या’ तारखेला पार पडणार बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले ? प्रेक्षकांनी ठरवली फायनलिस्टची यादी

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 चांगलाच गाजतोय. पहिल्या चार सीजनपेक्षा पाचव्या सीजनला जास्त टीआरपी मिळाल्याने मेकर्सही खुश आहेत. त्यातच बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

 

बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन लवकरच संपणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगू लागलीये.

 

बिग बॉस मराठीच्या काही फॅन पेजेसनी केलेल्या पोस्टनुसार पुढील महिन्याच्या पहिल्या रविवारी म्हणजे 6 ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. या खबरीमुळे बिग बॉस मराठीचे अनेक प्रेक्षक नाराज झाले आहेत. 100 दिवसांचा असणारा हा शो 70 दिवसातच आटपण्याचा मेकर्सनी निर्णय घेतल्याचं फॅन पेजचं म्हणणं आहे आणि हे प्रेक्षकांना पटलं नाहीये.

काही पेजच्या म्हणण्यानुसार शोचा फिनाले 6 नोव्हेंबरला पार पडेल तर काहींनी ऑक्टोबरमध्येच फिनालेचा एपिसोड शूट होणार असल्याचं म्हटलं आहे. बिग बॉस हिंदी सीजन 18 सुरु होत असल्यामुळे मेकर्सनी असा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. दरम्यान याबाबत कलर्स मराठी वाहिनी किंवा शोच्या निर्मात्यांनी कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नाहीये.

 

उत्तम टीआरपी असूनही केवळ बिग बॉस हिंदीसाठी शोच्या फॉरमॅटमध्ये केलेला बदल पटलेला नाही असं अनेक प्रेक्षकांनी कमेंट्स करत म्हटलं आहे. आता सगळीकडे फिनाले बाबत व्हायरल झालेली पोस्ट कितपत खरी आहे आणि या बातमीत किती तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागेल.

 

बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये प्रेक्षकांना कोणाला पाहायला आवडेल याची यादीही अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. प्रेक्षकांच्या मतानुसार सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, अंकिता प्रभू, धनंजय पोवार हे स्पर्धक फायनलमध्ये असावे असं अनेकांना वाटतंय. जान्हवी किल्लेकर, पॅडी कांबळे आणि वर्षा उसगावकर यांच्याबाबत काही मतभेद आहेत. पॅडी यांना प्रेक्षकांचा सपोर्ट असला तरीही जान्हवी आणि वर्षा यांचाही चाहतावर्ग मोठा असल्याने नेमकं फायनलमध्ये कोण असणार यात बरीच चढाओढ दिसणार आहे.

 

विशेष म्हणजे सतत वादग्रस्त गोष्टी करून चर्चेत राहणाऱ्या निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलला कोणत्याही प्रेक्षकाने फायनल स्पर्धकाच्या यादीत स्थान दिल नाहीये. निक्कीचे चाहते जरी तिला फायनलमध्ये पाहत असले तरीही महाराष्ट्रातील सामान्य जनतेचं मन जिंकण्यात निक्की आणि अरबाज अयशस्वीठरले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -