Monday, July 7, 2025
Homeमहाराष्ट्रम्युच्यूअल फंडात मिळतात भरपूर रिटर्न्स, पण नेमकं कोणत्या फंडात गुंतवणूक करावी? जाणून...

म्युच्यूअल फंडात मिळतात भरपूर रिटर्न्स, पण नेमकं कोणत्या फंडात गुंतवणूक करावी? जाणून घ्या….

आजकाल म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या बरीच वाढली आहे. म्युच्यूअल फंडात केलेल्या गुंतवणुकीवर चांगले रिटर्न्स मिळतात, असे समजले जाते. त्यामुळे काही वर्षांच्या गुंतवणुकीत भरपूर रिटर्न्स देणाऱ्या काही म्युच्यूअल फंडाबाबत जाणून घेऊ या…

 

लार्ज कॅप फंड्स हे असे फंड्स असतात जे मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. या श्रेणीत गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना 19 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स मिळालेले आहेत.

 

 

मल्टी कॅप फंड्स हे लार्ज, मीड आणि स्मॉलकॅप अशा सर्वच फंड्समध्ये पैसे लावतात. या फंडामध्ये बाजारातील स्थितीनुसार पोर्टफोलिओत बदल केला जातो. या श्रेणीत 25 टक्क्यांपर्यंत CAGR (कम्पाऊंड अॅन्यूअल ग्रोथ रेट) पाहायला मिळालेला आहे.

 

फ्लेक्झी कॅप फंडमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक केली जाते. या प्रकारच्या फंडामध्ये गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांना 21 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स मिळालेले आहेत.

 

कॉन्ट्रा फंड्समध्ये केलेली गुंतवणूक ही इतर गुंतवणुकीच्या तुलनेत जोखमीची समजली जाते. या प्रकारच्या म्युच्यूअल फंडात गेल्या पाच वर्षांत 27 टक्के रिटर्न्स मिळालेले आहेत.

 

मल्टी असेट अलोकेशन फंड हा एका प्रकारचा हायब्रिड फंड असतो. यात इक्विटी, डेट, सोने, रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली जाते. अशा प्रकारच्या फंडाने गेल्या पाच वर्षांत 19.2 टक्क्यांनी परतावा दिलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -