Thursday, October 17, 2024
Homeमहाराष्ट्रकॅप्टन कूलचा ‘ड्रोन’ शॉट; IPO पूर्वी या कंपनीत 4 कोटी ओतले, गुंतवणुकीच्या...

कॅप्टन कूलचा ‘ड्रोन’ शॉट; IPO पूर्वी या कंपनीत 4 कोटी ओतले, गुंतवणुकीच्या पिचवर माहीची पुन्हा दमदार बॅटिंग

क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर आता कॅप्टन कूलने गुंतवणुकीच्या पिचवर पण दमदार बॅटिंग सुरूच ठेवली आहे. त्याने आयपीओ येण्यापूर्वीच या कंपनीत 4 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यापूर्वी पण त्याने अनेक बड्या स्टार्टअप्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. क्रिकेटरसोबतच त्याच्याकडे व्यावसायिक गुण असल्याचे त्याने दाखवून दिले आहे. ड्रोन तयार करणारी कंपनी गरुड़ एअरोस्पेसमध्ये (Garuda Aerospace) त्याने गुंतवणूक केली आहे. ही कंपनी लवकरच बाजारात IPO आणण्याची तयारी करत आहे.

 

 

4 कोटींची गुंतवणूक

 

कॅप्टन कूल धोनीने गरुड एअरोस्पेसमध्ये किती रक्कम गुंतवणूक केली याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम 4 कोटी रुपये इतकी आहे. या गुंतवणुकीनंतर धोनीची या कंपनीतील गुंतवणूक आता 1.1 टक्के इतकी झाली आहे. यापूर्वी पण धोनीने अनेक स्टार्टअप्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक त्याच्या फायद्याची ठरली आहे.

 

धोनीच्या पाठबळामुळे उत्साह दुणावला

 

गरूड कंपनीच्या या प्रवासात सहभागी झाल्याचा आनंद असल्याचे धोनी म्हणाला. ही कंपनी जागतिक स्तरावर वेगाने पुढे जात आहे. कृषी, संरक्षण, औद्योगिक आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी ड्रोन तयार करण्याचा प्रयत्न कंपनी करत असल्याचे माही म्हणाला. गरुड़ एअरोस्पेसचे संस्थापक आणि सीईओ अग्निश्वर जयप्रकाश यांनी धोनीच्या पाठबळामुळे उत्साह दुणावल्याचे सांगितले. यामुळे आता आम्ही कंपनीला नवी दिशा आणि भरारी देऊ असे ते म्हणाले. गरुड आता आकाशी आणि दुर्गम भागातही सक्षमपणे पोहचत असल्याचे ते म्हणाले.

 

कंपनीचा बाजारात 50 टक्के वाटा

 

गरुड एअरोस्पेस कंपनीला ड्रोन निर्मिती आणि प्रशिक्षणासाठी DGCA कडून मान्यता मिळाली आहे, असं प्रमाणपत्र मिळवणारी ती एकमेव कंपनी ठरली आहे. ड्रोन बाजारात कंपनीचा 50 टक्के वाटा आहे. कृषी आणि सर्वसामान्य ग्राहक क्षेत्रात कंपनीने जोरदार आगेकूच केली आहे. आता कंपनी जगभरात पंख पसरत आहे. कंपनीमध्ये 200 हून अधिक कर्मचारी आहे. कंपनीत 30 विविध प्रकारचे ड्रोन तयार करते आणि 50 वेगवेगळ्या सेवा देते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -