बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने अनेक महत्त्वाच्या कल्याणकारी उपक्रमांना मंजुरी दिली. यापैकी, मंत्रिमंडळाने जुलै 2024 ते डिसेंबर 2028 पर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKAY) आणि इतर कल्याणकारी योजनांतर्गत मोफत तांदूळ पुरवठा सुरू ठेवण्यास हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे देशातील करोडो लोकांना याचा फायदा होणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले की, या उपक्रमासाठी ₹17,082 कोटी खर्च येणार आहे, जो संपूर्णपणे केंद्र सरकारकडून अर्थसहाय्यित आहे. विकासाला चालना देणे आणि पोषण सुरक्षा वाढवणे हा या निर्णयामागील उद्देश आहे.
एप्रिल 2022 मध्ये, आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने (CCEA) मोफत तांदूळ उपक्रम टप्प्याटप्प्याने देशभरात राबविण्याचा निर्णय घेतला, मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत हा उपक्रम तीन टप्प्यांत यशस्वीपणे राबविला गेला आहे.मोफत फोर्टिफाइड तांदळाच्या पुरवठ्यामुळे गरीबांमध्ये अशक्तपणा आणि अत्यावश्यक सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता कमी होण्याचा महत्वपूर्ण उद्देश आहे.
राजस्थान आणि पंजाबच्या सीमावर्ती भागात रस्ते विकास: 4,406 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चासह सीमावर्ती भागात 2,280 किमी रस्त्यांच्या बांधकामाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
नॅशनल मेरिटाइम हेरिटेज कॉम्प्लेक्स (NMHC) लोथल, गुजरात: या प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता देखील मिळाली आहे आणि दोन टप्प्यात पूर्ण होईल. भारताचा समृद्ध सागरी वारसा प्रदर्शित करणे आणि जगातील सर्वात मोठे सागरी वारसा संकुल विकसित करणे हे उद्दिष्ट आहे.