Wednesday, October 16, 2024
Homeमहाराष्ट्रबाबा सिद्धिकीच्या हत्येनंतर सलमानचा खानचा मोठा निर्णय, Bigg Boss18 च्या चाहत्यांसाठी महत्त्वाची...

बाबा सिद्धिकीच्या हत्येनंतर सलमानचा खानचा मोठा निर्णय, Bigg Boss18 च्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी

सलमान खान होस्ट करत असलेला बिग बॉस 18 नुकताच सुरू झाला आहे. शो सुरू होताच बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. या विकेंडला सलमान खान बिग बॉस18 होस्ट करणार नाही. बिग बॉसमध्ये सलमान खान दिसणार नाहीये. सलमान खानने बिग बॉस18 शुटींग कॅन्सल केलं आहे. माजी नेते बाबा सिद्धिकी यांची 12ऑक्टोबरच्या रात्री वांद्रे येथे हत्या करण्यात आली.बाबा सिद्धिकी आणि सलमान खान यांचे फार जवळचे संबंध होते. बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर सलमान खानने बिग बॉसचं शुटींग कॅन्सल केलं आहे.

 

सलमान खान आणि बाबा सिद्धिकी हे अनेक वर्षांपासून एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. बाबा सिद्धिकींच्या इफ्तार पार्टीला सलमान खान गेला नाही असं कधी झालं नाही. त्यांच्या मैत्री सर्वश्रृत आहे. सलमान खान आणि शाहरुख यांच्यातील शीतयुद्ध बाबा सिद्धिकी यांनीच त्यांच्या इफ्तार पार्टीमध्ये मिटवलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -