हातकणंगले वडगाव रस्त्यावरील आळते परिसरात हटिल ड्रिम लॉजिंगच्या ठिकाणी बेकायदेशीर वेश्या व्यवसाय चालविल्या प्रकरणी हातकणंगले पोलिसांनी संताजी लक्ष्मण धनगर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, रोख रकमेसह मोबाईल, रजिस्टर व कंडोम पाकिटे असा एकूण १७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जाम करण्यात आला आहे.
संताजी लक्ष्मण धनगर (वय ४२, रा. धनगर गल्ली, हातकणंगले) हा आळते येथील ड्रीम लॉजिंगच्या ठिकाणी बेकायदेशीर वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सोमवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी संबंधित ठिकाणी कारवाई केली. यावेळी दोन पीडित महिलांना तेथून बाहेर काढण्यात आले.
