Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापुरात रात्रीच्या अंधारात फिरते 8 फूट उंचीची महिला; व्हायरल व्हिडीओने भरली धडकी

कोल्हापुरात रात्रीच्या अंधारात फिरते 8 फूट उंचीची महिला; व्हायरल व्हिडीओने भरली धडकी

सोशल मीडिया हे असे ठिकाण आहे. जिथे आपण घरबसल्या जगभरातील संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतो. जगभरातील अनेक माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत असते. आणि व्हिडिओ आणि फोटोज व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ (Viral Video) हे कामाचे असतात, तर काही व्हिडिओ हे केवळ मनोरंजन करतात. आपण अनेक वेळा भूतांचे तसेच हॉरर व्हिडिओ पाहत असतो.

आपल्याला हे ऐकताना कितीही हसायला आले,तरी हे व्हिडिओज पाहताना मात्र आपल्याला खूपच भीती वाटते. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आपण अनेक भूतांचे व्हिडिओ व्हायरल झाल्याचे पाहिलेले आहे. असाच काहीसा प्रकार कोल्हापूरमध्ये घडलेला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) आपण पाहू शकतो की, कोल्हापूरमध्ये आठ फूट उंच महिलेची दहशत आहे. तेथील नागरिकांकडून देखील आपल्याला याची माहिती मिळालेली आहे. त्यामुळे कोल्हापूर मधील साने गुरुजी या वस्तीत देखील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. परंतु हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने इतर नागरिकांना देखील खूपच भीती वाटत आहे.

 

कोल्हापूर मध्ये गेल्या काही दिवसांपासून एक आठ फूट उंचीच्या महिलेची दहशत असलेली पाहायला मिळत आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळेस आठ फूट उंच असणाऱ्या एका महिलेचा भूत प्रेत असल्याची अफवा पसरत आहे. परंतु एखादी जिवंत व्यक्ती असे सोंग घेऊन लोकांना घाबरवत आहे,ही माहिती समोर आलेली नाही. परंतु ही घटना सीसीटीव्हीच्या कॅमेरामध्ये कैद झालेली आहे. रात्रीच्या अंधारात फिरणारी ही महिला दिवसा मात्र गायब होते. सध्या पोलिसांकडून देखील या घटनेचा शोध चालू झालेला आहे. रात्रीच्या अंधारात 8 फूट उंच फिरणारे हे भूत प्रेत आहे की एखादी खरी महिला आहे. याबाबत शोध चालू झालेला आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -