2024 या वर्षात अनेक नवनवीन स्मार्टफोन लॉन्च झालेले आहेत. या स्मार्टफोनची वर्षभर चांगली चर्चा झालेली आहे. तसेच परवडणाऱ्या किमतीमध्ये आणि चांगले फीचर्स असणारे हे फोन या वर्षात लॉन्च झालेले आहेत. आज आपण 2024 मधल्या टॉप पाच स्मार्टफोन बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ज्यांची खूप जास्त प्रमाणात चर्चा झालेली आहे. या फोनच्या किमती आणि फीचर्स आज आपण जाणून घेणार आहोत.
Google ने Pixel 8a भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. Pixel 7a गेल्या वर्षी लाँच झाला होता. आणि Pixel 8a अपग्रेडेड व्हर्जन आहे. Pixel 8a नवीन डिझाइन आणि Tensor G3 चिपसेटसह येतो. जो पूर्वी Pixel 8 आणि Pixel 8 Pro मध्ये वापरला होता.Google Pixel 8a भारतात 128 GB आणि 256 GB स्टोरेजमध्ये सादर करण्यात आला आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये 8 जीबी रॅम उपलब्ध असेल. 128 GB वेरिएंटची किंमत 52,999 रुपये आणि 256 GB ची किंमत 59,999 रुपये ठेवण्यात आली आहे. Pixel 8a अलॉय, बे, ऑब्सिडियन आणि पोर्सिलीन रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. Pixel 8a 14 मे रोजी लॉन्च झाला आहे.
Samsung Galaxy Z Flip 6 या वर्षी भारतात लॉन्च झाला. या फोनचे डिझाइन नेहमीच ट्रेंडमध्ये असते. यावेळी फोनचे वजन कमी केले आहे. यावेळी फ्लिपचे वजन हलके केले आह. आणि ते फक्त 187 ग्रॅम आहे. Samsung Galaxy Z Flip 6 मध्ये 4000 mAh बॅटरी आहे. त्याच्या बॅटरीसोबत कुलिंग सिस्टिमही उपलब्ध होणार आहे. याशिवाय यामध्ये AI सपोर्ट देखील मिळणार आहे, हा फोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो, ज्यामध्ये सिल्व्हर शॅडो, यलो, ब्लू, मिंट यांचा समावेश आहे. या फोनमध्ये ऑटो झूमची सुविधा आहे ज्यामुळे त्याचा कॅमेरा खूपच खास बनतो. फ्लेक्स कॅमही उपलब्ध होणार आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1,09,999 रुपये खर्च करावे लागतील.
OnePlus 12 स्मार्टफोनचे नवीन चारजण भारतात लॉन्च झाले आहे. हा नवीन एडिसन ग्लेशियर व्हाइट कलर ऑप्शनमध्ये येतो. फोनच्या 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 64,999 रुपये आहे. फोनची विक्री 6 जून 2024 पासून लॉन्च झाला आहे.. हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून खरेदी करता येईल. बँक ऑफरद्वारे फोन खरेदी केल्यास 3,000 रुपयांचा झटपट कॅशबॅक दिला जात आहे.
Vivo ने या फोनमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा सेन्सर वापरला आहे. या फ्लॅगशिप स्मार्टफोनसोबत कंपनीने Vivo X100s आणि Vivo X100s Pro देखील लॉन्च केला आहे. हे दोन्ही फोन जवळपास सारख्याच वैशिष्ट्यांसह येतात. या दोन्ही Vivo स्मार्टफोन्समध्ये 6.78-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,000 nits पर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फोनच्या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2800 x 1260 पिक्सेल आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 9300+ फ्लॅगशिप प्रोसेसर आहे Vivo X100 Ultra ची सुरुवातीची किंमत CNY 6499 म्हणजेच अंदाजे 75,000 रुपये आहे.
Motorola चा Moto G Stylus 5G (2024) लाँच करण्यात आला आहे. कंपनीने यामध्ये बिल्ट इन स्टायलस देखील दिले आहेत. ज्याचा वापर नोट्स बनवण्यासाठी आणि फोटो एडिटिंगसाठी करता येईल. फोनमध्ये 6.7 इंच आकारमानाचा POLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे (Moto G Stylus 5G 2024 कॅमेरा तपशील). हा एक मोठ्या बॅटरीने सुसज्ज असलेला स्मार्टफोन आहे (Moto G Stylus 5G 2024 बॅटरी तपशील). त्याची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. Moto G Stylus 5G (2024) ची किंमत $399.99 (अंदाजे रु 33,000) आहे.