क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर स्टार ओपनर तिसऱ्या सामन्यातून बाहेर झाला आहे. न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या साखळी अंतर्गत 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर 323 धावांच्या फरकाने विजय मिळवला. इंग्लंडने या विजयासह मालिकाही जिंकली. इंग्लंड या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. मात्र इंग्लंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या स्पर्धेतून बाहेर झालेली आहे. तसेच न्यूझीलंडचाही पत्ता कट झाला आहे. उभयसंघातील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना हा 14 डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनव्हे खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
न्यूझीलंड टीममध्ये कॉनव्हे याच्या जागी मार्क चॅपमॅन याचा समावेश केला आहे. कॉनव्हे आणि त्याची पत्नी पहिल्यांदा आई-वडील होणार आहेत. त्यामुळे कॉनव्हे तिसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नसणार, अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेट टीमच्या बॅल्ककॅप्स या सोशल मीडिया अकाउंटवरुन देण्यात आली आहे.
कॉनव्हे दोन्ही सामन्यात अपयशी
दरम्यान कॉनव्हेला पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात काही खास करता आलं नाही. कॉनव्हेने पहिल्या सामन्यातील दोन्ही डावात 2 आणि 8 अशा धावा केल्या. तर दुसर्या सामन्यातील पहिल्या डावात 11 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात भोपळाही फोडता आला नाही.
कॉनव्हे तिसऱ्या सामन्यातून आऊट
टेस्ट सीरिजसाठी इंग्लंड टीम : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, ऑली पोप (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, शोएब बशीर, रेहान अहमद, ऑलिव्हर रॉबिन्सन, मॅथ्यू पॉट्स, जॅक लीच आणि ऑली स्टोन.
कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ : टॉम लॅथम (कर्णधार), मार्क चॅपमॅन, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, टिम साउथी, विल्यम ओरुर्के, मिचेल सँटनर, जेकब डफी आणि विल यंग.