Wednesday, February 5, 2025
Homeराजकीय घडामोडीसंतोष देशमुख हत्याप्रकरणी पोलीस अधिक्षकांची बदली, शरद पवार आज कुटुंबियांची भेट घेणार

संतोष देशमुख हत्याप्रकरणी पोलीस अधिक्षकांची बदली, शरद पवार आज कुटुंबियांची भेट घेणार

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या घटनेने बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे आज मस्साजोग दौरा करणार आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची ते भेट घेणार आहेत. तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना वैद्यकीय रजेवर पाठवण्यात आले आहे.

 

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 13 दिवस पूर्ण होत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी अद्याप फरार आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार आज मस्साजोग दौरा करणार आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची ते भेट घेणार आहेत. “आमच्या राजाला न्याय पाहिजे” अशा आशयाचे बॅनर सध्या मस्साजोगमध्ये झळकताना दिसत आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणी शरद पवार आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

 

बातमी अपडेट होत आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -