टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 22 जानेवारीपासून टी 20i मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकूण 5 सामने खेळण्यात येणार आहेत. त्याआधी टीम इंडियाने हेड कोच गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात जोरदार सराव केला. बीसीसीआयने सरावाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
टीम इंडियाचे ऑलराउंडर हार्दिक पंड्या आणि उपकर्णधार अक्षर पटेल या दोघांनी जोरदार सराव केला. अक्षरची उपकर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका आहे. त्यामुळे अक्षरच्या कामगिरीकडे साऱ्यांचंच लक्ष असेल. तसेच हार्दिककडूनही जोरदार कामगिरी अपेक्षित असणार आहे
संजू सॅमसन या टी 20i मालिकेत प्रमुख विकेटकीपरच्या भूमिकेत असणार आहे. मात्र संजूचा इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी समावेश करण्यात आलेला नाही.
विस्फोटक फिनिशर रिंकु सिंह यानेही जोरदार सराव केला. रिंकूकडून या मालिकेत तडाखेदार खेळीची अपेक्षा असणार आहे.
नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा या युवा जोडीलाही टी 20i मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. दोघेही कशी कामगिरी करतात? याकडे टीम मॅनजमेंटचं लक्ष असणार आहे.