सिनेमा संपतो आणि तुमच्या उजव्या बाजूला बसलेल्या प्रेक्षकाच्या डोळ्यात अश्रू असतात आणि डाव्या बाजूला बसलेला प्रेक्षक shock मध्ये असतो, तेव्हा समजावं काय कमाल सिनेमा बनवला गेलाय. असे कमाल चित्रपट कितीतरी वर्षांने बनतात. विकी कौशल तो अभिनेता बनत चाललाय, ज्याचं नुसतं stardom वाढत नाहीय, तर तो अभिनेता म्हणून स्वतःला पुढे नेतोय, नवीन शिकतोय, नवीन करू पाहतोय.
Chhava Review: आपल्या कलाकृतीबद्दलची त्याची गंभीरता त्याला एका नव्या उंचीवर घेऊन गेली आहे. छावा ही तीच फिल्म आहे जी कोणाच्याही करिअरमध्ये एक करिश्मा ठरू शकते. हा सिनेमा एवढा कमाल आहे. विकीने यामध्ये आपला जीव ओतलाय. स्वतःला झोकून दिलंय आणि ही गोष्ट तुम्हाला प्रत्येक frame मध्ये जाणवू शकते. ही फिल्म 3 कलाकारांमुळे खास झाली आहे – विकी, अक्षय खन्ना आणि विनीत कुमार सिंह.
Chhava Review: ही कहाणी आहे छत्रपती संभाजी महाराजांची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाण्यानंतर जेव्हा मुघलांच्या आकांक्षा वाढू लागल्या होत्या, तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या नापाक इराद्यांना यशस्वी होऊ दिलं नाही. इथे कहाणी महत्त्वाची ठरते. त्यांची महानता, वीरता, कौशल्य महत्त्वाचं आहे.या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या इतिहासाची ही गौरवगाथा देशविदेशात पोहोचेल.
Chhava Review: कोट्यवधी लोकांना कळेल छत्रपती संभाजी महाराज कोण आहेत. त्यामुळे जर कुठल्याही गोष्टीवर थोडासा आक्षेप जरी असेल तरी त्याच्याकडे दूर्लक्ष करायला हवं, कारण चित्रपटाचा हेतू मोठा आहे. नियत स्वच्छ आहे आणि scale भव्य आहे.
Chhava Review: एका scene मध्ये जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचा भाऊ जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उलटसुलट बोलतात, तेव्हा संभाजी गरजतात. या scene मध्ये विकीची power अशी आहे की थिएटरमध्ये बसलेला प्रेक्षक अक्षरश: हादरतो. शेवटी, औरंगजेबची मुलगी म्हणते, “संभा अपनी मौत का जश्न मनाकर चला गया और हमें छोड़ गया अपनी जिंदगी का मातम मनाने” हे वाक्य सांगतं की संभाजी किती महान होते.
Chhava Review: तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य, महानता आणि वीरता अगदी जवळून अनुभवाल.फिल्मची प्रत्येक frame तुम्हाला खिळवून ठेवेल, पापण्यांची उघडझाप करण्याची संधीही मिळणार नाही. युद्धाचे scenes भव्य आहेत. बनावट वाटत नाहीत. कलाकारांचे अभिनय या फिल्मला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. ही ऐतिहासिक कथा तुमच्या मनात गर्व निर्माण करणारी आहे. कारण आपण त्या देशात राहतो जिथे छत्रपती संभाजी महाराजांसारखे योद्धे जन्माला आले.शेवटचा अर्धा तास इतका जबरदस्त आहे की नॉर्मल होण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल.