मोबाईल युजर्सना दर महिन्याला रिचार्ज करण्याच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या आकर्षक वार्षिक प्रीपेड प्लॅन ऑफर करतात. विशेषतः एअरटेल आणि रिलायन्स जिओने असे काही किफायतशीर प्लॅन सादर केले आहेत, जे वर्षभर नंबर अॅक्टिव्ह ठेवू इच्छिणाऱ्या किंवा मुख्यतः कॉलिंगसाठी सिम वापरणाऱ्या ग्राहकांसाठी उपयुक्त ठरतात.
एअरटेलचा 1,849 रुपयांचा वार्षिक प्लॅन
एअरटेलचा 1,849 रुपयांचा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध असून कंपनीच्या सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅनपैकी एक आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच, फ्री नॅशनल रोमिंग असल्यामुळे दुसऱ्या राज्यात प्रवास करताना अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. याशिवाय या प्लॅनमध्ये वर्षभरासाठी एकूण 3,600 SMS दिले जातात. मात्र, या प्लॅनमध्ये डेटा मिळत नाही. इंटरनेट वापरायचा असल्यास ग्राहकांना स्वतंत्र डेटा पॅक घ्यावा लागतो. म्हणूनच हा प्लॅन मुख्यतः फक्त कॉलिंग आणि अधूनमधून मेसेजसाठी सिम वापरणाऱ्या किंवा कमी खर्चात बॅकअप नंबर अॅक्टिव्ह ठेवू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी योग्य ठरतो.
एअरटेलचा 2,249 रुपयांचा प्लॅन
तुमच्याकडे एअरटेलचे सिम असेल आणि तुम्हाला कॉलिंगसोबत थोड्या प्रमाणात इंटरनेटचीही गरज असेल, तर 2,249 रुपयांचा वार्षिक प्लॅन अधिक चांगला पर्याय ठरू शकतो. या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंग मिळते. तसेच वर्षभरासाठी 3,600 SMS आणि एकूण 30GB डेटा दिला जातो. या डेटावर कोणतीही रोजची मर्यादा नसल्यामुळे ग्राहकांना तो गरजेनुसार कधीही वापरता येतो. हा प्लॅन विशेषतः अशा स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आहे ज्यांना दररोज जास्त डेटा लागत नाही, पण कधीमधी ब्राउझिंग, ईमेल किंवा चॅटिंगसाठी इंटरनेट आवश्यक असते.
रिलायन्स जिओचे वार्षिक प्लॅन
रिलायन्स जिओनेही ग्राहकांसाठी 3,999 रुपये आणि 3,599 रुपये असे दोन वार्षिक प्रीपेड प्लॅन आणले आहेत.
3,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा, दररोज 2.5GB 4G डेटा, दररोज 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. यासोबतच, प्लॅनमध्ये FanCode आणि JioHotstar चे 3 महिन्यांचे सब्सक्रिप्शन तसेच Google Gemini Pro चे 18 महिन्यांचे सब्सक्रिप्शन मोफत दिले जाते. 3,599 रुपयांच्या प्लॅनमध्ये FanCode सब्सक्रिप्शन वगळता इतर सर्व फायदे समान आहेत.





