Saturday, February 22, 2025
Homeक्रीडाChampions Trophy 2025 : चर्चा तर होणारच… चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाच्या जर्सीवर...

Champions Trophy 2025 : चर्चा तर होणारच… चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होण्यास अवघा एकच दिवस उरला असून उद्यापासून, अर्थात 19 फेब्रुवारीपासून क्रिकेटच्या रणसंग्रामाला प्रारंभ होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणारे सर्व, 8ही संघ हे नव्या जर्सीमध्ये दिसणार आहे. या आयसीसी स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या जर्सीचा रंग आणि डिझाइनही समोर आले आहे. विशेष म्हणजे इतर संघांप्रमाणेच भारतीय संघाच्या जर्सीवरही पाकिस्तानचे नाव लिहिलेले असेल. खरंतर, ICC च्या इव्हेंटमध्ये टीम्सच्या जर्सीवर टूर्नामेंटच्या लोगोसोबतच यजमान देशाचं नावही लिहीण्यात येतं. यंदा ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद हे पाकिस्तानकडे आहे. त्यामुळेचे या टूर्नामेंटसाठी सज्ज असलेल्या भारतीय संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचंही नाव असेल.

 

पाकिस्तानचं नाव तर आहेच आणखी विशेष काय ?

 

मात्र, भारतीय संघाची जर्सी वेगळी असू शकते, अशी अटकळ याआधी बांधली जात होती. त्यावर पाकिस्तानचे नाव लिहीण्यात आलं नसेल अशीही चर्चा होती. पण, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जर्सीमधीलतीय खेळाडूंचे फोटोसमोर आल्यानंतर त्यावर यजमान देशाचे म्हणजेच पाकिस्तानचे नाव असेल हे ( त्या फोटोंतून) स्पष्ट झालं. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयार करण्यात आलेल्या जर्सीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या खांद्यावर तिरंगा आहे. तर समोर INDIA असे मोठ्या अक्षरात लिहिलेले आहे. ही जर्सी निळ्या रंगाची आहे, जी वर्षानुवर्षे टीम इंडियाची ओळख आहे.

 

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जर्सीतील टीम इंडियाचे फोटो !

 

टीम इंडियाच्या 15 खेळाडूंनी नवीन जर्सीमध्ये फोटोशूट केले. हे सर्व तेच खेळाडू आहेत, ज्यांची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नव्या जर्सीतील टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघाचा कार्यक्रम कसा असेल ?

 

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही येत्या 19 फेब्रुवारीपासून ( बुधवार) सुरू होत आहे. आयसीसीच्या या स्पर्धेत टीम इंडिया दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच 20 फेब्रुवारीपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. संघाचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे, जो दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. यानंतर 23 फेब्रुवारीला भारत वि पाकिस्तान असा सामना रंगणार आहे. आणि 2 मार्च रोजी ग्रुप स्टेजच्या शेवटच्या मॅचमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -