जर तुमचंही स्वप्न पायलट बनण्याचं असेल तर ही माहिती नक्की वाचा. पायलट बनण्यासाठी कोणता कोर्स करावा लागतो, त्यासाठी कुठे ट्रेनिंग मिळते, त्याला किती खर्च होतो याची उत्तरे तुम्हाला मिळतील.
जर तुम्ही १२ वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही पायलट बनू शकता फक्त त्यासाठी तुम्हाला विज्ञान क्षेत्रातून १२ वी पास व्हावी लागेल. त्याशिवाय फिजिक्स आणि मॅथ्समध्ये ५० टक्क्याहून अधिक गुण असायला हवेत.
मेडिकल चाचणी करावी लागेल यशस्वी
पायलट कोर्स सर्च करण्यापूर्वी स्वत:ची मेडिकल चाचणी करावी लागेल जेणेकरून तुम्ही फीट आहात की नाही हे कळेल. त्यासाठी तुम्हाला क्लास २ मेडिकलसाठी अर्ज द्यावा लागेल. क्लास २ मेडिकल टेस्ट, पायलट बनण्यासाठी आवश्यक मानलं जाणारं मेडिकल सर्टिफिकेट आहे. ही मेडिकल चाचणी पायलटची मानसिकता, शारिरीक फिटनेस याची माहिती देते. पायलट विमान उड्डाणासाठी सुरक्षित आहे का त्यासाठी ही चाचणी करणे गरजेचे असते. या मेडिकल चाचणीसाठी तुम्हाला DCGA च्या वेबसाईटवर जाऊन तिथे प्रमाणित असलेल्या डॉक्टरांची वेळ घेऊन ती चाचणी करावी लागेल.
२ दिवसांची असते चाचणी
ही मेडिकल चाचणी २ दिवसांची असते. चाचणीनंतर तुमचा मेडिकल रिपोर्ट येतो ज्यातून तुम्ही पायलट बनण्यासाठी फिट आहात की नाही हे कळते. त्यानंतर क्लास १ मेडिकल चाचणी होते. त्यातून तुम्ही पायलट बनण्यास पात्र आहात की नाही हे स्पष्ट होते.
पायलट बनण्याचे २ पर्याय
तुम्ही २ पर्यायाने पायलट बनू शकता. पहिला पर्याय म्हणजे तुम्ही फ्लाईंग स्कूलमध्ये प्रवेश घेऊ शकता. जे तुमची परीक्षा घेतील आणि उड्डाणही करायला लावतील. तुम्हाला परीक्षा द्यायची आहे की उड्डाण करायचे हे तुम्हाला ठरवावे लागेल. काही लोक इन्सिट्यूटही ज्वाईन करतात.
२०० तासांची ट्रेनिंग घ्यावी लागते
Pariksha.dgca.gov.in(UDAAN) नावाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्टर करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला कॅम्प्युटर नंबर मिळेल. मग तुम्हाला परीक्षेसाठी तयारी करावी लागेल. यात ट्रेनिंग दिले जाईल. त्याला कर्मिशियल पायलट लायसन्स कोर्स म्हणतात. या कोर्सचे सर्व पेपर तुम्हाला क्लिअर करावे लागतील आणि तुम्हाला २०० तासांचं फ्लाईंग ट्रेनिंगही दिले जाईल. परीक्षा यशस्वी केल्यानंतर त्यानंतर दिलेल्या अवधीत उड्डाण करावे लागेल. आज परीक्षा दिली आणि २ वर्षांनी उड्डाण सुरू केले असं चालत नाही. या परिस्थितीत तुम्हाला पुन्हा परीक्षा घ्यावी लागते.
पायलट कोर्समध्ये काय काय असतं?
परीक्षा कोर्समध्ये सर्वात आधी मेटरॉलॉजी असते, त्यात तुम्हाला हवामानाबद्दल शिकवले जाते जे पायलटसाठी महत्त्वाचे असते. त्याशिवाय Navigation चं शिक्षण दिले जाते. Aircraft मध्ये इंजिन कसं काम करते, त्याचे बेसिक प्रिसिंपल आणि थेअरी काय हे शिकवले जाते. मग Air Regulation चं शिक्षण देत एअर ट्रॅफिक नियमाविषयी माहिती दिली जाते. प्रत्येक देशाचे एअर वाहतूक नियम वेगळे असतात. हा कोर्स करण्यासाठी जवळजवळ ३५ लाख ते १ कोटीपर्यंत खर्च येतो.
जॉबसाठी कसं Apply करायचं?
पायलटच्या जॉबसाठी सिलेक्शन फक्त मुलाखतीवर आधारित नाही. या मुलाखतीत तुमचं Hand Eye Coordination केले जाते. त्यामुळे Hand Eye Coordination चांगले बनवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ गेम्स खेळणे महत्त्वाचे आहे.
पगार किती मिळतो?
प्रोफेशनल पायलटच्या पगाराचा विचार केल्यास फ्लाईटमध्ये एक फर्स्ट ऑफिसर आणि एक कॅप्टन असतो. त्यात कॅप्टनची सॅलरी महिन्याला ८-१० लाख रूपये असते. फर्स्ट ऑफिसरचा पगार महिन्याला ३ लाखापर्यंत दिला जातो. भारतात कुठल्याही विमान कंपन्यांच्या पायलटचा सरासरी पगार १० ते १५ लाख प्रतिमहिना इतका आहे.