Sunday, July 27, 2025
Homeराजकीय घडामोडीधनंजय मुंडेंचा राजीनामा अटळ? अजित पवार अन् देवेंद्र फडणवीसांसोबत रात्री दोन तास...

धनंजय मुंडेंचा राजीनामा अटळ? अजित पवार अन् देवेंद्र फडणवीसांसोबत रात्री दोन तास बैठक, देवगिरी बंगल्यावर काय घडलं?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात देवगिरी येथे बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीला धनंजय मुंडे, (Dhananjay Munde) सुनील तटकरे, प्रफुल पटेल हे देखील या बैठकीला उपस्थित होते.

 

या बैठकीचा तपशील बाहेर आलेला नाही. मात्र, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात ही चर्चा झालेली आहे, अशी माहिती आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो समोर आल्यानंतर मराठवाड्यात भावना तीव्र होत असल्याची चित्र आहे. करुणा शर्मा धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या विरोधात आघाडी उघडली होती.

 

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील बैठक काल रात्री 8.50 वाजता मिनिटांनी चर्चेला सुरुवात झाली होती. त्यानंतर साडे दहा वाजता ही बैठक संपली. या दीड तासात नेमकं काय चर्चा झाली. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल का असा प्रश्न आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात विरोधी पक्षांकडून घोषणाबाजी करण्यात आली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे धनंजय मुंडे यांच्या विरोधात गाजेल अशी शक्यता आहे. त्यामुळं सत्ताधारी पक्ष एक पाऊल मागं जाऊन धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतो का ते पाहावं लागेल.

 

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. स्वत: ते अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी जात असतील तर ती मोठी घडामोड मानली जात आहे. 9 डिसेंबरपासून सुरु झालेलं प्रकरण वाढत चाललं आहे. सरकारच्या अडचणी वाढू नये या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका अजित पवार यांच्याकडे ठेवलेली आहे.

 

अजित पवारांवर दबाव वाढला

 

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भातील दबाव राष्ट्रवादी काँग्रेसवर वाढत चाललेला आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लोकभावना लक्षात घेता अजित पवार यांच्यावर दबाव वाढलेला पाहायला मिळतोय. धनंजय मुंडे स्वत: हून राजीनामा देणार का हे पाहावं लागणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर अजित पवार काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल.

 

करुणा शर्मा यांनी विधिमंडळात येणार असं म्हटलंय. अंजली दमानिया सकाळी साडे नऊ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. चार्जशीट मधील फोटो समोर आल्यानंतर राग अन् रोष निर्माण झालेला आहे. आता नेमकी सत्ताधाऱ्यांची भूमिका काय असेल हे पहिल्या सत्रात स्पष्ट होईल, अशी माहिती आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -