भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुर्वण संधी आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली आहे. भारतीय सैन्यात अग्निवीरमध्ये सामील होण्यासाठी अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरु होणार आहे. भारतीय लष्कराने एक मोठी संधी आणली आहे. अग्निवीरच्या भरती प्रक्रियेसाठी 8 मार्चपासून नोंदणी सुरू होणार आहे. 20 एप्रिल 2025 पर्यंत ही नोंदणी करता येणार आहे. ही प्रक्रिया आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसने सुरू केली आहे, जर तुम्हालाही आर्मी रिक्रूटमेंटमध्ये सहभागी व्हायचे असेल तर या संधीचा फायदा घ्या. लवकरात लवकर अर्ज भरा.
कोण अर्ज करू शकतो?
17.5 ते 21 वर्षे वयोगटातील कोणताही 10वी पास उमेदवार अग्निवीरमध्ये सामील होण्यासाठी अर्ज करू शकतो. मीडिया रिपोर्टनुसार, वाराणसी कन्टोन्मेंट येथील आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसचे संचालक कर्नल शैलेश कुमार यांनी तरुणांना अर्ज काळजीपूर्वक भरण्याचे आणि कोणाच्याही फंदात न पडण्याचे आवाहन केले आहे. सैन्य भर्ती कार्यालय किंवा अधिकृत वेबसाइटवरून भरतीशी संबंधित संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती पसरवली जाणार नाही.
कोणती कागदपत्रे गरजेची आहेत?
अग्निवीरसाठी अर्ज करताना उमेदवारांना काही महत्त्वाच्या कागदपत्रांची काळजी घ्यावी लागेल. या अंतर्गत, 10वीच्या गुणपत्रिकेत नमूद केलेले नाव, पालकांचे नाव आणि पत्ता फॉर्ममध्ये दिलेल्या तपशीलाशी जुळला पाहिजे. फक्त आधार कार्डशी जोडलेला मोबाइल क्रमांक फॉर्ममध्ये टाकावा लागेल. भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी, तुम्ही Joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता, फॉर्म भरताना, तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी योग्यरित्या रजिस्टर करा.