Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रतिच्या धाडसाला सलाम ! सकाळी 10वीचा पेपर दिला अन् संध्याकाळी जन्मदात्रीला अग्नी

तिच्या धाडसाला सलाम ! सकाळी 10वीचा पेपर दिला अन् संध्याकाळी जन्मदात्रीला अग्नी

आयुष्य अतिशय क्षणभंगुर आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. नशिबाचा खेळ विचित्र असतो. याचा पुनर्प्रत्यय कोकणातील सावंतवाडीत आला आहे. सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा जाधववाडीत एका मुलीने सकाळी दहावीचा गणिताचा पेपर लिहून दुपारी आपल्या आईवर अंत्यसंस्कार केल्याची अत्यंत दुर्दैवी आणि दु:खद घटना समोर आली आहे. सोमवारी अतिदुर्गम भागातील सिंधुदुर्गात हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून त्यामुळे अनेकांचे डोळे पाणावले आहेत. मात्र परिस्थितीचा आघात होऊनही खचून न जाता सामना करणाऱ्या त्या मुलीच्या धाडसाला सर्वजण सलाम करत आहेत. लीच्या धाडसाचे आणि तिला साथ देणाऱ्या नातलगांचे कौतुक केले जात आहे.

 

दु:ख बाजूला ठेवून धाडसाने दिली परीक्षा

 

मिळालेल्या माहितीनुसार,सातार्डा जाधववाडीतील रुपाली राजन जाधव ( वय 48) या महिलेचे अल्पशा आजाराने निधन झाले. तिच्या पश्चात पती आणि दोन मुलीच असल्याने तिचे अंत्यसंस्कार विधी कोणी करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. मोठी मुलगी धनश्री ही देवसु तालुका पेडणे येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता दहावीत शिकत असल्याने व सोमवारीच तिचा गणिताचा पेपर असल्याने एका बाजूला आईचे दुःख आणि दुसऱ्या बाजूला भविष्याचा प्रश्न असल्याने तिच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. मात्र तिच्या गावातील ग्रामस्थ व ती शिकत असलेल्या शाळा प्रशासनाने त्या मुलीच्या घरी भेट देत मुलीचे सांत्वन केलं आणि परीक्षेचे महत्त्व तिच्या लक्षात आणून दिलं.

 

काळाचा घाला सहन करत त्या मुलीने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुलीला परीक्षेला नेण्याची आणि आणून पुन्हा सोडण्याची जबाबदारी घेतली. त्यानुसार मुलीला पेपरसाठी नेण्यात आलं. परीक्षा झाल्यानंतर शाळा प्रशासनानेच पुन्हा तिला आईच्या अंत्यसंस्कारासाठी घरी आणूनही सोडले. मुलगी धनश्री हीच कुटुंबातील मोठी असल्याने तिच्या हस्ते आईचे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला. पण सकाळ पेपर असल्याने तो झाल्यानंतर संध्याकाळी आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामीण भागात मुलीने आईवर अंत्यसंस्कार करण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याने तिचे व तिला पाठिंबा देणाऱ्या सर्व सुधारणावादी शिक्षक, पालक, ग्रामस्थ यांचे अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -