Sunday, July 27, 2025
Homeक्रीडाटीम इंडियाच्या खेळाडूला धमकी, बाईकवरून पाठलाग अन् … क्रिकेटरचा धक्कादायक खुलासा !

टीम इंडियाच्या खेळाडूला धमकी, बाईकवरून पाठलाग अन् … क्रिकेटरचा धक्कादायक खुलासा !

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही भारतीय खेळाडूंसाठी एक शानदार आणि नेहमी लक्षात राहील अशी स्पर्धा होती. टीम इंडियाने या स्पर्धेत एकही सामना न गमावता जेतेपद पटकावले. ट्रॉफी जिंकल्यानंतर जवळपास सर्वच खेळाडू भारतात परतले आहेत. आता टीम इंडियाचे हे खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसणार असून 22 मार्चपासून आयपीएलच्या नव्या सीझनला सुरूवात होईल. मात्र याच दरम्यान, एका भारतीय क्रिकेटरने धक्कादायक खुलासा केला आहे. खरंतर हा खेळाडू 2021 च्या T20 विश्वचषकात टीम इंडियाचा भाग होता. पण या खेळाडूसाठी ही स्पर्धा खूपच खराब ठरली होती. एवढंच नव्हे तर या स्पर्धेनंतर त्याला भारतात परत न येण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या, काही लोकांनी त्याचा पाठलागही केला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

भारतीय खेळाडूसोबत धक्कादायक प्रकार

 

वास्तविक, मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या पराभवाचा खलनायक ठरला. भारतीय संघ ग्रुप स्टेजमधूनच स्पर्धेतून बाहेर पडला होता. या काळात वरुण चक्रवर्तीला 3 सामन्यात एकही विकेट घेता आली नाही आणि तो खूप महागडा बॉलरही ठरला होता. यानंतर वरुणला भारतीय संघातूनही वगळण्यात आले. जवळपास 3 वर्षे तो टीम इंडियात आपले स्थान निर्माण करू शकला नाही. यानंतर, त्याने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत पुनरागमन केले आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये केवळ 3 सामन्यात 9 विकेट घेतल्या. तो या स्पर्धेतील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता.

 

मिळाली होती धमकी

 

2021 च्या T20 वर्ल्ड कपबद्दल वरुण चक्रवर्ती लोकप्रिय अँकर गोबीनाथच्या यूट्यूब शोमध्ये बोलत होता. ‘माझ्यासाठी तो खूप वाईट काळ होता. मी डिप्रेशनमध्ये होतो. विश्वचषकासाठी निवड झाल्यानंतर मी न्याय देऊ शकत नाही, असे मला वाटले. मला एकही विकेट घेता आली नाही याचे दु:ख होते. त्यानंतर तीन वर्षे माझी टीम इंडियात निवड झाली नाही. त्यामुळे पदार्पणापेक्षा पुनरागमनाचा मार्ग माझ्यासाठी कठीण होता असं मला वाटते. 2021 च्या विश्वचषकानंतर मला धमकीचे फोन आले. भारतात येऊ नको, असंही कॉलवर सांगण्यात आले. प्रयत्न केल्यास तुम्ही ते करू शकणार नाही. लोकं माझ्या घरापर्यंत यायचे, माझा पाठलाही करायचे. मला लपून रहायला लागायचं. मी एअरपोर्टवरून घरी परत येत होतो तेव्हाव काही लोकांनी माझा पाठलागही केला. पण तेव्हाचा काळ आणि आता मला जे प्रेम मिळतंय, कौतुक होतंय, ते पाहून मला आनंद वाटतो ‘असंही वरूणने नमूद केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -