सोने आणि चांदीची महागाईची भांग कायम असल्याचे दिसले. दोन्ही धातुत तुफान उसळी दिसून आली. महागाईचा आलेख उंचावला आहे. सोने आणि चांदीत तुफान उसळी दिसून आली. सोने आता 90 हजारांच्या टप्प्यात आले आहे. तर चांदीने लाखांचा टप्पा ओलांडला आहे. ऐन रंगोत्सवातच दोन्ही धातुनी ग्राहकांना उन्हापेक्षा अधिक घाम फोडला आहे. तीन दिवसात दोन्ही धातुनी महागाईचे रेकॉर्ड मोडले आहेत. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…
सोन्याची भांग उतरेना
या आठवड्यात सोन्याने मोठी मुसंडी मारली. सोमवारी सोने 110 रुपयांनी वधारले. मंगळवारी 330 रुपयांनी स्वस्त झाले. बुधवारी 490 रुपये, गुरूवारी 600 आणि 120 रुपयांनी सोने महागले. तीन दिवसात सोन्याने 1200 रुपयांचा टप्पा गाठला आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 82,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 89,930 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
सोन्याची भांग उतरेना
या आठवड्यात सोन्याने मोठी मुसंडी मारली. सोमवारी सोने 110 रुपयांनी वधारले. मंगळवारी 330 रुपयांनी स्वस्त झाले. बुधवारी 490 रुपये, गुरूवारी 600 आणि 120 रुपयांनी सोने महागले. तीन दिवसात सोन्याने 1200 रुपयांचा टप्पा गाठला आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 82,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 89,930 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी लाखांच्या पार
चांदीने गेल्या दोन आठवड्यात मोठी मुसंडी मारली. सुरुवातीला चांदी 1100 रुपयांनी स्वस्त झाली होती. तर बुधवारी 2 हजार, गुरूवारी 1 हजार तर शुक्रवारी 2 हजारांनी चांदी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,03,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 86,843, 23 कॅरेट 86,495 22 कॅरेट सोने 79,548 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 65,132 रुपये, 14 कॅरेट सोने 50,803 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 98,322 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.