Sunday, July 27, 2025
Homeक्रीडादिल्ली कॅपिटल्सने लखनौला पराभूत करत मोडला आरसीबीचा विक्रम, काय ते वाचा

दिल्ली कॅपिटल्सने लखनौला पराभूत करत मोडला आरसीबीचा विक्रम, काय ते वाचा

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत तीनच संघांनी पाच विकेट गमवूनही 120 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ या यादीत अव्वल स्थानी होती. पण सोमवारी दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला आणि विक्रम आपल्या नावावर केला.

 

विशाखापट्टणमच्या वायएसआर स्टेडियमवर लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 65 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे पराभव स्पष्ट दिसत होता. पण दिल्ली कॅपिटल्सने 80 चेंडूत 146 धावा केल्या. तसेच अशक्य वाटणारा विजय 1 गडी राखून जिंकला.

 

आयपीएलच्या इतिहासात 5 विकेट गमावल्यानंतर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दिल्ली कॅपिटल्सच्या नावावर झाला आहे. यापूर्वी हा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या नावावर होता.

 

2016 च्या आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात आरसीबीने गुजरात लायन्सविरुद्ध 29 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी एबी डिव्हिलियर्सने (79) धावा करत विजय खेचून आणला. आरसीबीने 159 धावांचा पाठलाग करत 4 विकेट्सने विजय मिळवला. आरसीबीने 5 विकेट गमावल्यानंतर अगदी 130 धावा केल्या.

 

आता दिल्ली कॅपिटल्सने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 5 विकेट्स पडल्यानंतर 146 धावांची गरज होती. आशुतोष शर्मा (66) आणि विप्रज निगम (39) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सने गेल्या 8 वर्षांपासून आरसीबीच्या नावावर असलेला विक्रम मोडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -