Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रअतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा, शासनाने घोषित केली थेट नुकसानभरपाई

अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा, शासनाने घोषित केली थेट नुकसानभरपाई

मागील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील प्रचंड पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतमालाची नासधूस होऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. त्यावर राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला असून, अकोला जिल्ह्यातील 56,648 शेतकऱ्यांना एकत्रित 79 कोटी 48 लाख 51 हजार रुपयांची थेट मदत दिली जाणार आहे.

 

राज्य सरकारच्या निर्णयानुसार, या मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. 21 मार्चपासून तहसील कार्यालयांमार्फत ‘ई-पंचनामा पोर्टल’वर शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या माहितीनुसार, लवकरच या मदतीचा वितरण पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल.

 

या निर्णयामुळे अकोला जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या पुढील हंगामासाठी एक महत्त्वाची आर्थिक आधार मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -