Thursday, June 26, 2025
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी: बुलढाण्यात भीषण अपघात, 5 जण ठार, एसटी अन् लक्झरी बसच्यामध्ये...

मोठी बातमी: बुलढाण्यात भीषण अपघात, 5 जण ठार, एसटी अन् लक्झरी बसच्यामध्ये बोलेरा कारचा चेंदामेंदा

बुलढाणा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात (Accident) पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आले आहे.

 

तर वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. खाजगी प्रवासी बस एसटी बस आणि बोलेरो या तीन वाहनामध्ये हा भीषण अपघात (Buldhana Accident) झाला आहे.

 

भीषण अपघातात 5 जण ठार, 24 जण जखमी

 

प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी साडेपाचच्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली. त्यानंतर पाठीमागून येणारी खाजगी प्रवासी बस ही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. तर जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. मात्र हा भीषण अपघात नेमका कसा आणि कुणाच्या चुकीमुळे झाला, हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

एसटी अन् लक्झरी बसच्यामध्ये बोलेरा कारचा चेंदामेंदा

 

प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील भरधाव बोलेरो शेगावकडून कोल्हापूरकडे जात होती. याच वेळी एक एसटी महामंडळाची बस जी पुण्याकडून परतवाडाकडे जात होती. अशातच एक खासगी प्रवासी वाहतूक बस या दोन अपघातग्रस्त वाहनांना धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहे, त्यातील 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे. खासगी बसमध्ये त्या बसचा चालक अद्याप फसला असून त्याला बाहेर काढण्याचे काम सध्या पोलिसांकडून केलं जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की यातील तीनही वाहनांचा चुराडा झाला आहे. सध्या घटनास्थळी पोलीस मोठ्या प्रमाणात हजार असून पुढील कारवाई केली जात आहे.

 

समृद्धी महामार्गावरील पुन्हा लोखंडी अँगल तुटला, अनेक वाहनांचे टायर फुटले

 

बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर चानेज 320 जवळील एका पुलावर लोखंडी रोडचा तुकडा तुटून महामार्गावर आल्याने रात्रीच्या वेळेस जवळपास आठ वाहनांची टायर फूटली आहेत हा लोखंडी तुकडा तुटून पुलाच्या वर आल्याने यावर भरधाव वाहने धडकल्याने अनेक वाहनांची समोरची दोन्ही टायर फुटल्याने रात्रीच्या वेळेस वाहनधारक रस्त्यात अडकून पडले होते समृद्धी महामार्ग प्रशासन व कंट्रोल रूमला या अडकलेल्या वाहनधारकांनी फोन केल्यावरही जवळपास एक तास द्या वाहनधारकांना मदत मिळाली नाही विशेष म्हणजे कालच समृद्धी महामार्ग मार्गावरील टोल हा 19 टक्क्यांनी वाढविण्यात आला समृद्धी महामार्गावर लोखंडी रोडचा तुकडा तुटून यापूर्वीही अनेक वाहनांचे टायर कुठून अपघात झालेले आहेत मात्र अद्यापही समृद्धी महामार्ग प्रशासन याबाबत व प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर दिसत नसल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -