Thursday, June 26, 2025
Homeसांगलीकवठेमहांकाळमध्ये अनैतिक संबंधातून महिलेचा खून 

कवठेमहांकाळमध्ये अनैतिक संबंधातून महिलेचा खून 

कवठेमहांकाळ शहरातील धुळगाव रस्ता परिसरातील महिलेच्या खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, याप्रकरणी किरण आकाराम गडदे (वय 20, रा.

 

बाज, ता. जत) या संशयिताला मालगाव (ता. मिरज) येथून अटक करण्यात आली. शानाबाई शंकर जाधव (वय 58) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शानाबाई धुळगाव रस्त्यावरील हॉटेल डायमंडजवळ भाड्याने खोली घेऊन राहत होत्या. गुरुवार, दि. 26 रोजी त्यांच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी कवठेमहांकाळ पोलिसांशी संपर्क साधला. स्थानिक पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन पाहणी केली, त्यावेळी कुलूप होते. मात्र घरातून दुर्गंधी येत होती. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून पाहिले असता, शानाबाई यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या गळ्याभोवती स्टोल गुंडाळलेला होता. बाहेरून कुलूप असल्यामुळे संशयिताने महिलेचा गळा दाबून खून केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली.

 

घटनेनंतर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर, जतचे उपअधीक्षक सुनील साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी खुनाचा छडा लावण्यासाठी सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त केले होते. पथकातील हवलदार अनिल कोळेकर, संदीप नलावडे, सोमनाथ गुंडे यांना, कवठेमहांकाळमधील खुनाच्या गुन्ह्यातील संशयित किरण गडदे असून तो मालगाव येथील लक्ष्मीनगर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मालगाव परिसरात सापळा लावला. त्यावेळी तेथे एक युवक संशयितरित्या थांबलेला दिसला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता, त्याने प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु नंतर त्याने खुनाची कबुली दिली. अनैतिक संबंधाच्या कारणातून झालेल्या वादातून दि. 23 मार्चच्या रात्री गळा आवळून शानाबाई यांचा खून केल्याची कबुली त्याने दिली. संशयिताला अटक करून कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

 

गुंतागुंतीचा तपास

 

या खुनाचा तपास गुंतागुंतीचा होता. घटनास्थळी कोणताही भौतिक व तांत्रिक पुरावा मिळालेला नव्हता. शेजार्‍यांच्या चौकशीतूनही फारशी माहिती समोर आली नव्हती. त्यामुळे या खुनाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर तांत्रिक माहितीचे विश्लेषण व खबर्‍यांच्या माहितीच्या आधारावर संशयिताला अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आल्याचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -