Saturday, January 17, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापुरातील 10 गावातील नागरिक होणार मालामाल; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं आश्वासन

कोल्हापुरातील 10 गावातील नागरिक होणार मालामाल; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं आश्वासन

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोकाक ते उदगाव येथील बाधित शेतकऱ्यांना चौपट मोबदला देण्याचं आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.

 

मुंबईत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली चोकक ते अंकली राष्ट्रीय मार्गावरील भुसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळावा यासाठी बैठक झाली. खासदार धैर्यशील माने यांच्यासह आरोग्यमंत्री व पालकमंत्री प्रकाश अबिटकर इतरही आमदार उपस्थित होते.

 

या बैठकीत चौपट मोबदला देण्याविषयी सकारात्मक चर्चा झाली. शिवाय महामार्ग प्राधिकरण व जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी सकारात्मक प्रस्ताव राज्य सरकारकडे तातडीने पाठविण्याचा आदेश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -