महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील महिलांना ST प्रवासात ५०% सूट देण्याचा ऐतिहासिक निर्णय यापूर्वी घेतला होता. यामुळे अगदी कमी पैशात महिलावर्ग लांबचा एसटी प्रवास करू लागला. आता महिलांप्रमाणेच पुरुषांनाही एसटी प्रवासा दरम्यान सवलत देण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. ब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सवलत देण्याची घोषणा प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केली आहे. ते एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत नाट्य मंदिर येथे आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण योजनांचा शुभारंभ आणि गौरव पुरस्कार सोहळ्यानिमित्त बोलत होते. या वेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय डॉ माधव कुसेकर एसटीचे सर्व वरीष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जुलैपासून 15 टक्के सवलत– ST Bus
यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले, कमी गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांची संख्या वाढावी या उद्देशाने लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सवलत आम्ही देणार आहोत. येत्या जुलैपासून ही योजना कार्यान्वित होणार आहे. याचा फायदा ई- शिवनेरी सारख्या बसने (ST Bus) प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना होणार आहे. तसेच बदली प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी आणि सेवा जेष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांच्या बदल्या व्हाव्यात. तसेच मानवी हस्तक्षेप पूर्णपणे थांबवा या उद्देशाने एसटीच्या सर्व बदल्या या ऑनलाइन पद्धतीने करण्यात येतील अशी घोषणाही प्रताप सरनाईक यांनी केली.
७५ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकून राहिलेल्या खूप कमी संस्था देशात अस्तित्वात आहेत. एसटी महामंडळ (ST Bus) त्यापैकी एक आहे. आज ७७ वर्षानंतर सुद्धा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील एसटीचे महत्त्व कमी झालेलं नाही. त्यामुळे आपली एसटी भविष्यात अशीच मार्गक्रमण करत राहील असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. यावेळी “बस फॉर अस” या ST प्रेमी संस्थेने तयार केलेले गेल्या 77 वर्षातील एसटीचा प्रवास चित्रमय रित्या दाखवण्यात आलेले एसटीचा वाहननामा हे कॉफी टेबल पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.