Monday, July 7, 2025
Homeमहाराष्ट्रचोरांनी बँकेतून ५२ कोटींचे सोने लुटले, CCTV ही पळवून नेले, त्यानंतर काळी...

चोरांनी बँकेतून ५२ कोटींचे सोने लुटले, CCTV ही पळवून नेले, त्यानंतर काळी जादू केली…

सोन्याचे भाव गगनाला भिडले असताना आता चोरांनी देखील हात साफ केले आहेत. देशातील सर्वात मोठी चोरी करीत चोरांनी बँकेच्या तिजोरीतील तब्बल ५२ कोटींचे सोने लुटले आहे. या चोरट्यांनी चोरी करताना विकेण्डची निवड केली. चोरट्यांनी बँकेची सर्व सीसीटीव्ही यंत्रणा आणि अलार्म यंत्रणा तोडून टाकली. त्यानंतर सीसीटीव्हीचा रेकॉर्डर देखील चोरटे सोबत घेऊन गेले आणि जाताना बँकेत काळी जादूही करुन गेले आहेत.

 

कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यात कॅनरा बँकेच्या एका शाखेतून चोरांनी कोट्यवधीचे सोने लुटले आहे. ही चोरी कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यातील कॅनरा बँकेच्या मनागुली शाखेत झाली आहे. चोरांनी बँकेतील लॉकरमधून 52 कोटी रुपये किंमतीचे सोने लुटल्याचे स्पष्ट झाले आहे. या बँकेला असलेल्या लाँग विकेण्डच्या सलग दोन दिवसांच्या सुट्ट्यांचा फायदा घेत चोरट्यांनी चांगलाच हात साफ केला आहे.

 

लाँग विकेण्डची निवड केली

२३ मे रोजी ही चोरी करण्यात आली. त्यानंतर २४ आणि २५ मे रोजी लाँग विकेण्ड आल्याने बँकेला सलग दोन दिवस सुट्टी होती. त्याचा फायदा घेत या चोरट्यांनी सीसीटीव्हीचा सगळा रेकॉर्डही सोबत नेला असल्याचे चोरट्यांचे चेहरे कैद झालेले सीसीटीव्ही निरुपयोगी ठरले आहेत. या चोरट्यांनी जाताना बँकेत काळ्या बाहूल्या ठाकून काही गुढ विद्या आणि काळी जादू केल्याने बँकेचे कर्मचारी धास्तावले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.

 

चोरीनंतर केली काळी जादू

चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी बँकेचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले होते. चोरीनंतर बँकेतील सीसीटीव्हीचा नेटवर्क कॉमकॉर्डर रेकॉर्डरही सोबत घेऊन गेले. त्यामुळे पोलिसांना चोरट्यांचे चेहरे दिसले नसल्याने या प्रकरणाचा तपास करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. चोरट्यांचा चोरीमागचा उद्देश्य समजू शकलेला नाही. चोरट्यांनी चोरीनंतर एक काळी बाहुली बँकेत ठेवली आहे. त्यामुळे चोरट्यांनी बँकेत काहीतरी पूजा केल्याचेही दिसत असल्याचे विजयपुरा पोलिसांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -