शहापूर परिसरातील साईनगर करांडे माभागातील गादी कारखान्यात शॉर्टकटने आग लागली. या दुर्घटनेत ५ लाखांचे साहित्य आगीच्या
भक्ष्यस्थानी पडले. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या २ यांनी पाण्याचा मारा करत अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. या घटनेबाबत पोलीसात उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सलीम राजू नदाफ यांचा शहापुर येथील साईनगर करांडे मळा परिसरात गादी कारखाना आहे. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे नदाफ यांनी कारखाना बंद केला होता. परंतु मंगळवारी सकाळी धुर बेत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.
शहापूर येथील गादी कारखान्याला आग लागली त्याप्रसंगी घेतलेले छायाचित्र. (छाया-मयूर चिंदे
याबाबतची माहिती नदाफ आणि शहापूर पोलीस ठाण्यास दिली. तसेच महानगरपालिकेच्या अग्रिशमन दलाला पाचारण केले. यावेळी नागरीक आणि अग्निशमन दलाच्या २ बंबांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. या घटनेत कापसाचा
साठा, ड्रॉव्हरमधील मोबाईल, इलेक्ट्रिक वजनकाटा, मशिन तयार गाया, टेबल यासह अन्य साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले आहे. घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात उशीरापर्यंत नोंद झाली नव्हती.