Monday, July 7, 2025
Homeमहाराष्ट्रअकरावी प्रवेशासाठी SC-ST ओबीसी कोटा जोडल्याने नवा वाद, शिक्षण विभागाकडून महत्त्वाची माहिती

अकरावी प्रवेशासाठी SC-ST ओबीसी कोटा जोडल्याने नवा वाद, शिक्षण विभागाकडून महत्त्वाची माहिती

शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे अल्पसंख्यांक महाविद्यालयांमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत एससी, एसटी, ओबीसी कोटा लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अल्पसंख्यांक महाविद्यालयांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय अल्पसंख्यांक संस्थांच्या 50% कोट्यावर परिणाम करणारा असल्याचा आक्षेप त्यांनी घेतलाय. काही संस्थांनी याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने सुधारित परिपत्रक जारी करून महत्त्वाची माहिती दिली आहे. यात अल्पसंख्यांक कोटयाला कुठलाही धक्का लावण्यात येणार नाही असे सुधारित परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

 

काय आहे वादाचं मूळ?

अल्पसंख्यांक महाविद्यालय शिक्षण संस्थांमध्ये अकरावी प्रवेशाच्या वेळी एससी एसटी ओबीसी कोटा जोडल्याचा शासन निर्णय मागील महिन्यात जारी करण्यात आला होता… यावर अल्पसंख्यांक संस्थांनी नाराजी व्यक्त करत कोर्टात जाण्याची तयारी दर्शवली. अल्पसंख्यांक संस्था आणि महाविद्यालयांमध्ये 50 टक्के जागा या आरक्षित आहेत… त्यामध्ये एससी एसटी आणि ओबीसी कोटा जोडल्यास हा कोटा 86% पर्यंत जाईल… त्यामुळे खुल्या प्रवर्गातील जागांच्या टक्का हा कमी होईल… मात्र यावर शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आला आहे

 

सुधारित परिपत्रकात काय म्हटलंय?

अल्पसंख्यांक महाविद्यालय संस्थांमध्ये 50% कोटा हा ठेवण्यात आला असून पहिल्या तीन प्रवेश केल्यानंतर कोट्यातील प्रवेश क्षमतेपेक्षा कमी झाल्यास उर्वरित जागा चौथी फेरी सुरू होण्यापूर्वी प्रत्यार्पित करण्यात येतील… परंतु पहिल्या तीन फेरी दरम्यान कुठल्याही प्रकारे 50% कोट्याला धक्का लावता येणार नाही. त्याशिवाय पहिल्या फेरीअंती अल्पसंख्यांक संस्थातील अल्पसंख्यांक कोट्यातील जागा रिक्त राहिल्यास पहिल्या फेरीनंतर त्या जागा प्रत्यार्पित करण्याची मुभा सुद्धा महाविद्यालयाला देण्यात आली आहे…अल्पसंख्यांक कोट्यातील 50% जागांपैकी जागा प्रत्यार्पित करण्यासाठी कुठले प्रकारे बंधन हे अल्पसंख्यांक संस्था महाविद्यालयावर नसणार आहे… हा निर्णय घेणे ऐच्छिक असणार आहे.

 

अकरावीच्या प्रवेशाची मुदत वाढवली

11 वी ऑनलाईन प्रवेश प्रकियेला आता 5 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. इन हाऊस कोट्या अंतर्गत खाजगी व्यवस्थापनाच्या कनिष्ठ महाविद्यालयात 10 टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वेब साईटवर इन हाऊस कोट्यातील शाळांमध्ये बदल करण्यासाठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून शिक्षण संचालनालयाने हा निर्णय घेतला आहे.

 

इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 अंतर्गत विद्यार्थी नोंदणीसाठी दिनांक 26 मे 2025 ते 3 जून 2025 हा कालावधी देण्यात आला होता. 6 मे 2025 च्या शासन निर्णयातील तरतुदीबाबत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालयातील इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्यासाठी आवश्यक बदलाबाबत शासनाने 31 मे रोजीच्या पत्रान्वये आदेश दिले असल्याने आता या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे प्र. शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -