Saturday, February 14, 2026
Homeकोल्हापूरप्रेयसीचा खून केलेला प्रियकर अद्याप पसार

प्रेयसीचा खून केलेला प्रियकर अद्याप पसार

प्रेयसी समीक्षा भारत नरसिंगे (वय 23, रा. जय भवानी गल्ली, कसबा बावडा) हिचा खून केलेला प्रियकर सतीश मारुती यादव (सध्या रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर, मूळ रा. पेंद्रेवाडी, उंड्री ता.पन्हाळा) हा अद्याप पसार आहे. पोलिसांनी त्याच्या शिवाजी पेठ व पेंद्रेवाडीतील घरावर छापे टाकले; पण तो मिळाला नाही. दरम्यान, पोलिसांनी यादव याने गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला.

 

लिव्ह इनमध्ये राहून लग्नाला नकार देत असल्याच्या रागातून यादव याने 3 जून रोजी दुपारी प्रेयसी समीक्षा हिचा चाकूने भोसकून खून केला. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी चार पथके तैनात केली आहेत. त्याचा मोबाईल बंद असल्याने पोलिसांना लोकेशनही सापडत नाही. मृत समीक्षाचे खुनावेळी रक्ताने माखलेले कपडे, यादवने गुन्ह्यात वापरलेला चाकू, समीक्षाची मैत्रीण आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आयशू अंपले, समीक्षाचती आई, बहिणीचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -