तुम्हाला Amazon आणि Flipkart माहीतच असेल.. तुम्ही कदाचित अनेक वस्तू या दोन्ही इ कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून खरेदीही केल्या असतील. संपूर्ण जगात आपला डंका वाजवणाऱ्या या दोन्ही कंपन्या त्यांच्या स्वस्त सामान, भरगोस सूट आणि बम्पर ऑफर मुळे प्रसिद्ध झाल्यात. त्यातही अनेक वर्ष ग्राहकांसोबत काम करत असल्याने त्या विश्वासार्ह्य सुद्धा नक्कीच आहेत. Amazon आणि Flipkart वरून तुम्ही कपडे, घड्याळ, बूट, इथपासून ते सौंदर्य प्रसाधने, घरगुती उपकरणे अशा सर्वच वस्तू खरेदी करू शकता… प्रत्येक वस्तूंवर तुम्हाला बम्पर डिस्काउंट देण्याचं काम कंपनी न चुकता करत असते. मात्र एकीकडे सर्वत्र महागाई असताना आणि दुकानातील वस्तूंच्या किमतीही वाढलेल्या असताना दुसरीकडे Amazon आणि Flipkart ला स्वस्तात वस्तू विकणं कसं परवडत? असा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिकच आहे. याचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला Amazon आणि Flipkart च्या व्यवसायाचा नेमका फंडा समजून घ्यायला हवा….
Amazon-Flipkart चा बिसनेस मंत्र-
यातील पहिली गोष्ट म्हणजे लहान व्यवसायांना प्रोत्साहन देऊन…. MSMEs ला प्रोत्साहन देऊन, Amazon-Flipkart जास्तीत जास्त वस्तू स्वस्तात विकू शकतात. एमएसएमई म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग. MSMEs कमी किंमतीत वस्तू पुरवतात. यामुळे ग्राहकांना कमी किंमतीत दर्जेदार आणि चांगल्या प्रतीचे सामान मिळते.
दुसरा मुद्दा म्हणजे थोक खरेदी आणि सप्लाय चेन व्यवस्थापन… Amazon आणि Flipkart या दोन्ही नावाजलेल्या कंपन्या मोठ्या प्रमाणात सामान थेट उत्पादकांकडून खरेदी करतात, ज्यामुळे त्यांना थोक दरात डिस्काउंट मिळते. त्यांचे प्रभावी सप्लाय चेन व्यवस्थापन वाहतूक आणि साठवण खर्च कमी करते. त्यामुळे या वस्तू कमी पैशात ते आरामात आपल्या प्लॅटफॉर्मवर विकू शकतात.
तिसरा महत्वाचा फंडा म्हणजे नफा कमी पण विक्री जास्त… होय, Amazon-Flipkart या दोन्ही इ कॉमर्स कंपन्यांना भलेही प्रत्येक वस्तुमागे जास्त नफा मिळत नसेल, परंतु त्यांचा भर हा कमी नफ्यात जास्तीत जास्त विक्रीवर असतो.. यामुळे मार्जिन जरी कमी असलं तरी जास्त वस्तूंच्या विक्रीमुळे होणार नफा बरोबर लेव्हलला येतो. महत्वाचं म्हणजे यामुळे अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर ग्राहकांचा एक मोठा गट मिळतो.
चौथी गोष्ट म्हणजे बँक ऑफर्स आणि अतिरिक्त सवलती…. Amazon आणि Flipkart वरील वस्तूंवर कोणत्या ना कोणत्या बँकेच्या कार्डवर सूट देण्यात येते. त्याचा कंपन्यांनाही याचा फायदा मिळतो. प्रत्यक्षात, विक्रीत दाखवलेली किंमत ही सर्व डिस्काउंनंतरची असते. यामध्ये बँक ऑफर देखील समाविष्ट आहे. यामुळे कंपन्या त्यांच्या वस्तू स्वस्त दरात विकू शकतात.
पाचवी गोष्ट म्हणजे नुकसान सहन करण्याची तयारी.. होय, कधी कधी मोठी झेप मारायची असेल तर २ पाऊले मागे यावं लागत, Amazon आणि Flipkart सुद्धा हीच गोष्ट करतात. काहीवेळा या कंपन्या ग्राहकांना खुश करण्यासाठी आणि आपल्याकडे वळवण्यासाठी काही वस्तूंच्या विक्रीवर नुकसान सहन करतात, ज्याला ‘लॉस लीडर स्ट्रॅटेजी’ म्हणतात. यामुळे काही उत्पादने बाजारापेक्षा खूपच स्वस्त मिळतात… नंतर ते त्यांच्या चांगल्या काळात हे नुकसान वसूलही करते ज्याचा ग्राहकांना नंतर अंदाजही नसतो.