Thursday, June 26, 2025
HomeसांगलीSangli : बाळाचा मृत्यू; 11 लाख भरपाई देण्याचे आदेश

Sangli : बाळाचा मृत्यू; 11 लाख भरपाई देण्याचे आदेश

गर्भवती महिलेच्या जन्मजात बाळाचा मृत्यू व गर्भाशयास दुखापत केल्याबद्दल रुग्णालय व डॉक्टर यांनी 11 लाख रुपये भरपाई व्याजासह पीडित महिलेला देण्याचे आदेश सांगली येथील ग्राहक न्यायालयाने दिले आहेत.

 

न्यायाधीश प्रमोद गो. गिरीगोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली मनीषा वनमोरे व अर्पिता फणसळकर यांच्या पीठाने हा आदेश दिला.

 

तसेच शारीरिक, मानसिक व भावनिक त्रासापोटी भरपाई म्हणून 10 लाख रुपये, त्यावर 5 जानेवारी 2013 पासून 7 टक्के व्याज, आर्थिक खर्चापोटी एक लाख रुपये व तक्रारी अर्जाचा खर्च म्हणून 10 हजार रुपये पीडित महिलेला देण्याचे आदेशही दिले आहेत. पीडित महिलेतर्फे अ‍ॅड. धन्यकुमार धावते व अ‍ॅड. वैभव केळकर यांनी काम पाहिले. मधुरा शंकर गुरव (वय 23, रा. निंबळक, ता. तासगाव) ही महिला प्रसूतीसाठी 4 जानेवारी 2013 रोजी किर्लोस्करवाडी (ता. पलूस) येथील राधाबाई मॅटर्निटी हॉस्पिटल ट्रस्ट संचलित रुग्णालयामध्ये दाखल होती. डॉ. विजयमाला सतीश चौगुले यांनी त्यांच्यावर उपचार केले. त्याचदिवशी त्यांची प्रसूती झाली. परंतु त्यांचे बाळ मृत होते. जन्मत:च ते बाळ मृत होते, असा डॉक्टरांनी अहवाल दिला, तर रुग्णालयातील नोंदीमध्ये जन्मानंतर ते बाळ मृत झाल्याचे नमूद आहे.

 

प्रसूतीनंतर त्रास होऊ लागल्याने महिलेची प्रकृती खालावू लागली. त्यांना मिरज येथील भारती हॉस्पिटल येथे दाखल केले. तिथे महिलेच्या गर्भाशयाला गंभीर इजा झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यामुळे गर्भाशय काढण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यानंतर त्या महिलेचे गर्भाशय काढण्यात आले. याप्रकरणी निष्काळजीपणाबद्दल मधुरा गुरव यांनी सांगली येथील ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -