Thursday, June 26, 2025
Homeमहाराष्ट्रपैसे पडल्याची बतावणी करून हॉटेल व्यावसायिकाला 6.70 लाखांना गंडा

पैसे पडल्याची बतावणी करून हॉटेल व्यावसायिकाला 6.70 लाखांना गंडा

गाडीमागे पैसे पडल्याची बतावणी करत मोटारसायकलला अडकवलेली तब्बल सहा लाख सत्तर हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी भरदिवसा लांबवल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बँक ऑफ इंडियाच्या वडगाव शाखेसमोर घडली.

 

वडगाव पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

हातकणंगले तालुक्यातील सावर्डे येथील हॉटेल व्यावसायिक रामचंद्र तुकाराम लुगडे हॉटेल बांधकामासाठी पतसंस्थेतून घेतलेल्या कर्जाची रक्कम काढण्यासाठी बँकेत आले होते. त्यांनी आठ लाख रुपये काढून त्यातील 1 लाख 30 हजार रुपये मुलाच्या खात्यावर भरले. उर्वरित 6 लाख 70 हजार रुपये पिशवीत घेऊन ते बँकेबाहेर आपल्या मोटारसायकलजवळ आले. पिशवी हँडलला अडकवून निघणार इतक्यात एका टोपी घातलेल्या तरुणाने ‘तुमचे पैसे खाली पडलेत’ असे सांगितले. लुगडे गाडीवरून उतरून नोटा गोळा करू लागले. हीच संधी साधत त्या तरुणाने हँडलला अडकवलेली पैशांची पिशवी हिसकावत मोटारसायकलवर थांबलेल्या साथीदारासह धूम ठोकली. लुगडे यांनी आरडाओरडा केला; पण चोरटे पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जयसिंगपूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी साळुंके व पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनीही पाहणी केली. पोलिसांची पथके रवाना झाली असून, अधिक तपास सहायक फौजदार चव्हाण करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -