मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून येत्या 18 ऑगस्टपासून खंडपीठाचं काम सुरू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींकडून 1 ऑगस्ट रोजी याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होणारा विलंब टाळण्यासाठी कोल्हापुरातील खंडपीठ महत्त्वाचं आहे. त्यामुळे सहा जिल्ह्यांतील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. वेळेसोबत पैशाचीही बचत त्यामुळे होणार आहे. कोल्हापुरातील खंडपीठाचे नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर त्याचे सर्व स्तरातून स्वागत केलं जात आहे.