Sunday, August 24, 2025
Homeमहाराष्ट्रदारू पाजण्याच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

दारू पाजण्याच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे दारू पाजण्याच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. अविनाश ऊर्फ विशाल जयवंत जावीर (वय ३५) असे मृत व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी मयताची पत्नी वंदना विशाल जावीर (रा.मराठी शाळेच्या मागे, वडगाव रासाई, ता. शिरूर, व्यवसाय शेतमजुरी) यांनी आरोपी राहुल दत्ता गावंडे (रा. पाटील मळा, वडगाव रासाई, ता. शिरूर) याच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली.

 

शनिवारी, दि. १६ रोजी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास वडगाव रासाई गावाच्या हद्दीतील हॉटेल सृष्टी परमिट रूम व बियर बार समोरील अंबिका पान स्टॉलजवळ आरोपी राहुल गावंडे व मयत अविनाश ऊर्फ विशाल जावीर यांच्यामध्ये दारू पाजण्याच्या कारणावरून भांडण झाले. या भांडणात आरोपी राहुल याने अविनाश याला मारहाण केली. यामध्ये अविनाश ऊर्फ विशाल याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो मृत्यू पावला.

 

या प्रकरणातील आरोपी राहुल गवांडे फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नकाते हे पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -