अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यातील बैठकीनंतर तेल पुरवठ्याबाबत कमी झालेली चिंता आणि पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या जीएसटी प्रणालीत सुधारणा (GST Reforms) घोषणेचे शेअर बाजाराने सोमवारी (दि.१८ ऑगस्ट) जोरदार स्वागत झाले.
सुरुवातीला सेन्सेक्स १,१०० अंकांची वाढ नोंदवली. त्यानंतर सेन्सेक्स ६७६ अंकांच्या वाढीसह ८१,२७३ वर स्थिरावला. तर निफ्टी ५० निर्देशांक २४५ अंकांनी वाढून २४,८७६ वर बंद झाला.
आजच्या सत्रात ऑटो, Consumer सेक्टरमध्ये खरेदीचा जोर अधिक दिसून आला. आयटी वगळता इतर सर्व सेक्टर्स हिरव्या रंगात बंद झाले. ऑटो निर्देशांक सर्वाधिक ४.१ टक्के वाढला. Nifty Consumer Durables ३.३ टक्के वाढीसह बंद झाला. रियल्टी २ टक्के तर मेटल, एफएमसीजी, टेलिकॉम आणि प्रायव्हेट बँक निर्देशांक १ ते २ टक्के वाढले.
तर आयटी, फार्मा आणि एनर्जी शेअर्सवर दबाव राहिला.सेन्सेक्सवर मारुती शेअर्सची ८.९ टक्के वाढीसह सर्वात चांगली कामगिरी राहिली. त्याचबरोबर बजाज फायनान्स ५ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ३.७ टक्के, बजाज फिनसर्व्ह ३.७ टक्के, एम अँड एम ३.५ टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर ३.४ टक्के, ट्रेंट २.८ टक्के, एशियन पेंट्स २.२ टक्के, अदानी पोर्ट्स २ टक्के वाढला. तर दसरीकडे आयटीसी, एलटी, इटरनल, टेक महिंद्रा हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के घसरले.
बाजारातील तेजीचे तीन प्रमुख कारणे
ट्रम्प- पुतीन यांच्यात बैठक
जीएसटी प्रणालीत सुधारणा होणार
आशियाई बाजारात तेजी