Saturday, August 23, 2025
Homeअध्यात्म20 दिवसानंतर लागणार वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण, वेळ आणि सूतककाळ काय ?

20 दिवसानंतर लागणार वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण, वेळ आणि सूतककाळ काय ?

ज्योतिषशास्रानुसार चंद्रग्रहण लागणे एक महत्वाची खगोलीय घटना आहे. याला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. ज्योतीषशास्रानुसार ग्रहणाचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो. सप्टेंबर 2025 मध्ये दोन ग्रहण लागणार आहे.ज्यात एक सुर्यग्रहण आणि एक चंद्रग्रहण आहे. सप्टेंबरमध्ये लागणारे चंद्रग्रहण या वर्षाचे दुसरे चंद्रग्रहण असणार आहे.जे आतापासून २० दिवसांनी लागणार आहे. खास बाब म्हणजे या वर्षाचे दुसरे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. चला तर याचा सुतककाल केव्हापर्यंत असेल आणि या दरम्यान कोणतेही काम करु नये

 

चंद्रग्रहण केव्हा आणि का लागते ?

चंद्रग्रहण पृथ्वी सुर्य आणि चंद्राच्यामध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण घडते. पृथ्वी, सुर्य आणि चंद्र एका सरळ रेषेत आले की ही अद्भूत घटना घडत असते. यामुळे चंद्रावर पृथ्वीची सावली पडते. याच खगोलीय घटनेला चंद्रग्रहण म्हणतात. ही घटना केवळ पौर्णिमेला घडू शकते, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या विपरीत दिशेला असतो. चंद्रग्रहणाच्या स्थितीत पृथ्वी सुर्याचा प्रकाशाला चंद्रापर्यंत पोहचू देत नाही.ज्यामुळे चंद्रावर पृथ्वीची सावली पडते आणि तो धुसर किंवा लालसर दिसू लागतो.

 

चंद्रग्रहण केव्हा आणि का लागते ?

चंद्रग्रहण पृथ्वी सुर्य आणि चंद्राच्यामध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण घडते. पृथ्वी, सुर्य आणि चंद्र एका सरळ रेषेत आले की ही अद्भूत घटना घडत असते. यामुळे चंद्रावर पृथ्वीची सावली पडते. याच खगोलीय घटनेला चंद्रग्रहण म्हणतात. ही घटना केवळ पौर्णिमेला घडू शकते, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या विपरीत दिशेला असतो. चंद्रग्रहणाच्या स्थितीत पृथ्वी सुर्याचा प्रकाशाला चंद्रापर्यंत पोहचू देत नाही.ज्यामुळे चंद्रावर पृथ्वीची सावली पडते आणि तो धुसर किंवा लालसर दिसू लागतो.

 

२०२५ मध्ये भारतात चंद्रग्रहणाची वेळ काय ?

भारतीय वेळेनुसार वर्षाचे दुसरे चंद्रग्रहण भारतात ७ सप्टेंबर रोजी रात्री ९.५८ वाजता सुरु होऊन ८ सप्टेंबर रोजी रात्री १.२५ वाजेपर्यंत चालणार आहे. या दरम्यान चंद्र लालसर नारंगी दिसतो. यास ब्लडमून देखील म्हटले जाते. हे चंद्रग्रहण संपूर्ण चंद्रग्रहण असेल ( खग्रास ) आणि हे जेव्हा पृथ्वीची संपूर्ण सावली संपूर्ण चंद्राला झाकते तेव्हाच खग्रास चंद्रग्रहण घडते.

 

चंद्रग्रहणात काय करु नये ?

चंद्र ग्रहणाच्या वेळी काही गोष्टी करणे निषिध्द मानले गेले आहे. चंद्रग्रहण सुरु असताना पूजा करु नये. देवाच्या मूर्तीला स्पर्श करु नये. जेवण बनवू नये. गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणात खास काळजी घ्यावी घरातून बाहेर पडू नये अशी धार्मिक मान्यता आहे.

 

चंद्र ग्रहणाचा सूतक काळ केव्हा ?

चंद्रग्रहणाचा सूतक काळ ९ तास आधीच लागतो. यासाठी ७ सप्टेंबरच्या चंद्रग्रहणाचा सूतककाळ ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.५७ वाजता सुरु होईल. चंद्रग्रहणाच्या समाप्तीनंतर सूतककाळही संपेल.

 

ग्रहणाचा सूतककाळ काय ?

सूतककाळ ग्रहण लागण्याच्या आधीचा काळ असतो. त्यास अशुभ मानले जाते. सुर्यग्रहणमध्ये हा काळ १२ तास आधी सुरु होतो. आणि चंद्रग्रहणात हा काळ ९ तास आधी सुरु होतो. ग्रहणाच्या सूतककाळात काही कार्य करण्यास मनाई असते.

 

सूतककाळाचा प्रभाव

हिंदू धर्मानुसार सूतककाळला अशुभ मानले जाते. या वेळी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव अधिक असतो. गर्भवती महिलांना सूतककाळात विशेष काळजी घ्यावी असा सल्ला दिला जातो. ग्रहणाचा प्रभाव जन्माला येणाऱ्या बाळावर पडू शकतो. सूतककाळात मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. आणि कोणतेही धार्मिक अनुष्ठान केले जात नाही.

 

ग्रहणाच्या सूतककाळात काय करु नये

 

सूतककाळाच्या दरम्यान जेवण बनवू नये

 

सूतककाळाच्या दरम्यान केस कापू नये, तेल लावू नये

 

सूतककाळाच्या दरम्यान झोपू नये

 

सूतककाळाच्या दरम्यान शिलाईचे काम देखील करु नये

 

सूतककाळात जेवण करण्यासही मनाई आहे

 

सूतककाळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये

 

सूतककाळात पूजा आणि शुभ कार्य करु नये

 

सूतककाळात तुळशीच्या रोपांना स्पर्श करु नये

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -