Saturday, August 23, 2025
Homeब्रेकिंगअकिवाट - कुरुंदवाड रस्ता वाहतुकीसाठी बंद; नागरिक, जनावरांचे स्थलांतर सुरू

अकिवाट – कुरुंदवाड रस्ता वाहतुकीसाठी बंद; नागरिक, जनावरांचे स्थलांतर सुरू

कृष्णा आणि पंचगंगा पाणी पातळीतील वाढीमुळे अकिवाट – कुरुंदवाड दरम्यान असणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे

 

पाणी पातळीतील वाढीमुळे अकिवाट गावाच्या शेत शिवारात राहणाऱ्या कुटुंबांचे आणि गोठ्यातील जनावरांचे स्थलांतर सुरू झाले आहे.

 

नदी परिसरातील अनेक कुटुंबे व जनावरे स्थलांतरित होत आहेत. यातील कुटुंबे नातेवाईक यांच्याकडे जात असून तर काही अकिवाट, टाकळीवाडी येथील सुरक्षित स्थळी आसरा घेत आहेत. टाकळीकडून कुरुंदवाड कडे होणारी वाहतूक सध्या गुरुदत्त कारखाना मार्गे बाळूमामा मंदिर ते कुरुंदवाड अशी सुरू आहे. अकिवाट मजरेवाडी दरम्यान महापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने पूर्णपणे वाहतूक बंद झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -