Saturday, August 23, 2025
Homeब्रेकिंगगंगा नदीत स्नानासाठी जाताना काळाचा घाला! ट्रक-ऑटोच्या भीषण धडकेत 7 महिला जागीच...

गंगा नदीत स्नानासाठी जाताना काळाचा घाला! ट्रक-ऑटोच्या भीषण धडकेत 7 महिला जागीच ठार; 4 जणांची प्रकृती गंभीर

बिहारची राजधानी पाटणा येथे आज (शनिवार) सकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघाताने परिसर हादरला. ट्रक आणि ऑटोची समोरासमोर धडक होऊन ८ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

मृतांमध्ये महिलांचा समावेश असून सर्व जखमींवर तातडीने पाटण्यातील पीएमसीएच रुग्णालयात (Patna PMCH Hospital) उपचार सुरू आहेत.

 

ही दुर्घटना दानियावान-हिलसा राज्य महामार्ग क्रमांक ४ वरील सिगारियावा स्टेशनजवळ घडली. जोरदार धडकेत ऑटोचा चक्काचूर झाला. अपघातानंतर ट्रकचा चालक वाहनासह पसार झाला असून पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील मृतांमध्ये ७ महिला असल्याचे समोर आले आहे. सर्वजण नालंदा जिल्ह्यातील रेरा मालमा गावचे रहिवासी होते. ते गंगा नदीत स्नानासाठी फतुहाला जात होते. परंतु, मार्गात झालेल्या या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एका जखमीने उपचारादरम्यान प्राण गमावले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

पोलिसांचा तपास सुरू

 

घटनेची माहिती मिळताच दानियावान पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दरम्यान, ट्रकचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत. धडकेचा आवाज ऐकून परिसरातील लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. स्थानिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. या अपघातामुळे संपूर्ण भागात शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -