भारताच्या पोस्ट विभागाने (India Post) अमेरिकेकडे जाणारी सर्व प्रकारची टपाल सेवा (Postal Services) तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने भारतीय वस्तूंवर (Indian Goods) 50 टक्के टॅरिफ ( Tariffs) लावल्याने आणि नवीन कस्टम्स नियम लागू केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
अमेरिकेचा नवा नियम (New US Duty Rules)
30 जुलै 2025 रोजी अमेरिकेने नवीन कस्टम निर्णय जारी केला. याअंतर्गत 29 ऑगस्टपासून 800 डॉलर्सपर्यंतच्या वस्तूंवरील (DutyFree Goods) शुल्कमुक्त सवलत रद्द करण्यात आली आहे.
म्हणजेच आता अमेरिकेत जाणाऱ्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय पोस्ट वस्तूंवर शुल्क (Custom Duty) आकारले जाईल. मात्र, 100 डॉलर्सपर्यंतच्या गिफ्ट वस्तूंना (Gift Items) शुल्कातून सवलत मिळणार आहे.
भारताचा निर्णय (India Post Suspension Decision)
अमेरिकेच्या या निर्ययानंतर, 25 ऑगस्ट 2025 पासून अमेरिकेकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या टपाल सेवांचे बुकिंग थांबवले जाईल. 100 डॉलर्सपेक्षा कमी किमतीच्या वस्तू मात्र पाठवता येतील. अमेरिकेकडे जाणारे हवाई वाहतूकदार (Air Carriers) तांत्रिक तयारी नसल्यामुळे या सेवा स्वीकारण्यास असमर्थ आहेत. आधीच बुक केलेल्या पण न पाठवता येणाऱ्या वस्तूंवर ग्राहकांना परतावा (Refund) मिळणार आहे.
व्यापार तणावाची पार्श्वभूमी (India-US Trade Tensions)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावले आहे. ट्रम्प यांनी भारतावर रशियन तेल खरेदी केल्याबद्दल अतिरिक्त 25 टक्के दंड (Penalty Tariff) ठोठावला आहे. भारताने या निर्णयाला ‘अन्यायकारक, अव्यवहार्य आणि अनुचित’ म्हटलं आहे. तसेच राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी सर्व उपाय केले जातील असे स्पष्ट केले आहे.
ग्राहकांसाठी संदेश
पोस्ट विभागाने म्हटलं आहे की, ‘सध्याची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच सेवा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न केले जातील. तोपर्यंत नागरिकांनी धीर धरण्याची विनंती आहे.’
भारत-अमेरिका यांच्यातील वाढत्या व्यापार तणावाचा फटका थेट सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे. India Post Suspension मुळे अमेरिकेत नातेवाईकांना, व्यवसाय भागीदारांना किंवा ग्राहकांना पाठवल्या जाणाऱ्या पार्सल्स व पोस्ट तात्पुरती थांबली आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या 50 टक्के टॅरिफचा फटका अनेक उद्योगांना बसत असल्याचं चित्र आहे. भारतीय वस्त्रोद्योगावर त्यामुळे मोठं संकट निर्माण झालं असून त्याची निर्यात ठप्प झाली आहे.