Sunday, August 24, 2025
Homeइचलकरंजीभिंत कोसळून एकाच कुटूंबातील सहाजण जखमी

भिंत कोसळून एकाच कुटूंबातील सहाजण जखमी

प्रापंचिक साहित्याचेही नुकसान तोरणा नगरमधील घटना बांधकाम सुरु असताना शेजारील घराची भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली सापडल्याने सहाजण जखमी झाले. तसेच प्रापंचिक साहित्यासह ५० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास तोरणानगर परिसरामध्ये घडली. या घटनेस जबाबदार बांधकाम मालक नानासो शिवाजी वायदंडे (वय ५९ रा. लालनगर) यांच्यावर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी जमीर शाहबुद्दीन गोलंदाज (वय ४४ रा. सहारा निवारा कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, जमीर गोलंदाज हे सेंट्रीग कामगार असून ते तोरणा नगर परिसरातील सहारा निवारा कॉलनीत भाड्याच्या घरात राहण्यास आहेत. त्यांच्या घरालगतच नानासो वायदंडे यांच्या मालकीचे आरसीसी बांधकाम सुरु आहे. या बांधकामासाठी पिलरचे खड्डे आणि कुपनलिका खोदताना गोलंदाज यांच्या घराची भिंत खिळिखळी झाली होती. याबाबत वारंवार सांगुनही वायदंडे दुर्लक्ष करत होते. जमीर गोलंदाज, त्यांच्या पत्नी जबीन गोलंदाज, मुलगा अमन, मुली आलिया व आलिशा तसेच शाहबुद्दीन गोलंदाज हे गाढ झोपेत असताना शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास गोलंदाज राहण्यास असलेल्या घराची भिंत अचानकरणे कोसळली, गोलंदाज कुटुंबियांचा आरडाओरडा ऐकुन शेजारील नागरीक जागे झाले. त्यांनी मदतकार्य राबवून सर्वांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून जखमींना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. तर घरातील टिव्ही, फ्रीज, कपाट व प्रापंचिक साहित्याचे जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -