इचलकरंजी-हातकणंगले रोडवरील पंचगंगा साखर कारखाना परिसरातील कमानीनजीक पूर्वीच्या वादावरून भांडण करून मित्राला मित्रानेच चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. रविंद्र मारुती कोंडेकर (वय ३९ रा. गणेशनगर) असे जखमीचे नाव आहे. घटनेनंतर हल्लेखोर धनंजय अशोक कलढोणे पसार झाला. त्याचा शिवाजीनगर पोलीस शोध घेत असून जखमी व हल्लेखोर हे पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
याबाचत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गणेशनगर परिसरातील रविंद्र कोंडेकर आणि धनंजय कलढोणे हे दोघे मित्र असून ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. शनिवारी दुपारी स्टेशन रोडवरील पंचगंगा साखर कारखाना परिरसरातील एका बारमधून मद्यपान (करून बाहेर पडल्यानंतर त्या दोघांत शाब्दिक वाद झाला. त्यातूनच वाद वाढत जाऊन हाणामारी सुरू झाली. यावेळी धनंजय याने स्वतःकडील चाकू काढून रविंद्र याच्या
पोटात भोसकले. त्यामध्ये रविंद्र गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडला. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या रविद्रला पाहून नागरिकांची गर्दी होऊ लागल्याने धनंजय याने दुचाकीवरून पलायन केले. रविंद्रच्या मित्रांनी धाव घेत रिक्षातून उपचारासाठी त्याला इंदिरा गांधी सामान्य स्णालयात दाखल केले. दरम्यान, रविंद्र याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला सांगली सिव्हिल स्णालयात दाखल केले असून शिवाजीनगर पोलीस हल्लेखोर धनंजयचा शोध घेत आहेत.