Tuesday, September 16, 2025
Homeराजकीय घडामोडीजरांगेंच्या आंदोनलाबाबत नवा आदेश आला, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

जरांगेंच्या आंदोनलाबाबत नवा आदेश आला, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज सायंकाळी या आंदोलनाची मुदत संपली होती, मात्र मुंबई पोलिसांनी आणखी एका दिवसासाठी या आंदोलनाला परवानगी दिली आहे. आता उद्याही मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु राहणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे पथक, क्यूआरटी, आरएएफ तसेच विशेष दल सोमवारीही मुंबईत तैनात राहणार असल्याची माहिती समोर आली आहे

 

आज मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आंदोलकांचा मोठा लोंडा सीएसएमटी स्थानकात गेला. त्यामुळे सीएसएमटी स्थानकात तुफान गर्दी झाली आहे. भर पावसात आंदोलक सीएसएमटी समोर नाचत असल्याच चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे.

 

कशी आहे जरांगे पाटलांची प्रकृती?

खासदार सुप्रिया सुळे आज आझाद मैदानावर जरांगे पाटलांची भेट देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र प्रकृती खालावल्यामुळे जरांगे पाटील यांनी सुळेंशी बोलण टाळलं. यानंतर बोलताना सुळे म्हणाल्या की, ‘जरांगे पाटलांना विकनेस आला आहे, कारण त्यांनी 4 दिवसांपासून काहीही खाल्लेल नाही.’ दरम्यान डॉक्टर जरांगेंच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

 

सुप्रिया सुळेंना घेरलं

मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे आझाद मैदानातून बाहेर पडत होत्या. यावेळी त्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. तसेच एक मराठा-लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे यावेळी काही आंदोलकांनी खासदार शरद पवार यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. काही आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या कारचा पाठलाग केला. तसेच सुळे यांच्या कारवर काही लोकांनी बॉटलही फेकल्या. एका आंदोलकाने तर शरद पवार यांनी मराठ्यांचे वाटोळे केले आहे, असाही आरोप केला.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस टीव्ही नाईन मराठीशी बोलताना म्हणाले की, असं करण योग्य नाही. कुठलेही नेते तिथे गेल्यानंतर त्यांना योग्य वागणूक मिळाली पाहिजे. घोषणाबाजी करणं बाटल्या फेकणं योग्य नाही. हुडदंगबाजी करुन काहीच मिळणार नाही. आम्ही मराठा समाजासाठी हिताचे निर्णय घेतले आहेत. मी आणि एकनाथ शिंदेंनी आरक्षण दिले. मराठा समाजाचे लोक आरक्षणाचा लाभ घेत आहे असं फडणवीस म्हणाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -