ताजी बातमी /ऑनलाईन टिम
इचलकरंजीत आज मंगळवार दि. ०२ सप्टेंबर २०२५ रोजी सांयकाळी ०५.३० वा. अटल महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. याचा शुभारंभ श्रीमती पल्लवी पाटील (आयुक्त तथा प्रशासक, इचलकरंजी महानगरपालिका) , मा. श्री. धैर्यशील माने (खासदार), मा.आम.श्री. सुरेशराव हाळवणकर ( महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा), श्री. डॉ. राहुल आवाडे (आमदार), मा.आम.श्री. प्रकाश आवाडे (मा. वस्त्रोद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य), मा.श्री. राजवर्धन नाईक निंबाळकर (कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष भाजपा) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम नामदेव मैदान, कागवाडे मळा, इचलकरंजी येथे होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अलका अ. स्वामी (माजी नगराध्यक्षा इचलकरंजी), मा. श्री. तानाजी पोवार (माजी उपनगराध्यक्ष), मा.श्री. अमित गाताडे (कार्याध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अ.प), मा.श्री. रविंद्र माने (जिल्हाध्यक्ष शिवसेना पक्ष) , मा.श्री. श्रीरंग खवरे (अध्यक्ष- भाजपा इचलकरंजी (पूर्व)), मा. श्री. बाळासाहेब माने (अध्यक्ष भाजपा इचलकरंजी (ग्रामीण)), मा.श्री. अमर खोत (अध्यक्ष- भाजपा युवा मोर्चा इचलकरंजी (ग्रामीण)), मा.श्री. सचिन पवार अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा इचलकरंजी (पूर्व), मा.श्री. शहाजी भोसले (जिल्हा सरचिटणीस), मा.श्री. अनिल डाळ्या (अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना) हे उपस्थित राहणार आहेत.
तर मा.श्री. सतिश पंडित जिल्हा सरचिटणीस, मा.श्री. शशिकांत बाबुराव मोहिते अध्यक्ष- भाजपा इचलकरंजी शहर (पश्चिम), क्रिएटिव्ह ग्राफिक्स , मा.श्री. प्रमोद बचाटे अध्यक्ष- भाजपा युवा मोर्चा इचलकरंजी (पश्चिम), मा.श्री. शुभम प्रल्हाद बरगे प्रमुख भाजपा वैद्यकीय मदत कक्ष कोल्हापूर (पूर्व)हे निमंत्रक असणार आहेत.
याचे संयोजक हेमत वरुटे, सहसंयोजक आशिष खंडेलवाल हे राहणार आहेत. या कार्यक्रमाला जास्तीतजास्त जणांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक तसेच संयोजकांनी केले आहे.