Saturday, September 6, 2025
Homeमहाराष्ट्रविमान हवेत असताना अचानक पक्षी धडकला, त्यानंतर…विमानात 272 प्रवासी, नागपुरची घटना

विमान हवेत असताना अचानक पक्षी धडकला, त्यानंतर…विमानात 272 प्रवासी, नागपुरची घटना

नागपुरहून कोलकाता येथे निघालेल्या इंडिगोच्या विमानाने अचानक इमर्जन्सी लँडिंग केलं. विमानाला अचानक पक्षी धडकला. या नंतर वैमानिकाने नागपूर येथे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केलं. या घटनेच्यावेळी विमानात 272 प्रवासी होते. हवेत विमान उड्डाणवस्थेत असताना पक्षी धडकल्याने विमानाच्या पुढच्या भागाच नुकसान झालं. वैमानिकाने वेळीच निर्णय घेतल्याने एक मोठा हवाई अपघात टळला. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. कुठलही नुकसान झालेलं नाहीय.

 

विमानाला पक्षी धडकल्यानंतर विमानाच संतुलन बिघडलं. प्रवाशांमध्ये घबराट पसरली. लोक दहशतीमध्ये आले. केबिन क्रू ने प्रवाशांना शांत राहण्याचं आवाहन केलं. पायलट समयसूचकता दाखवत तात्काळ विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केलं. विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर सीनियर एयरपोर्ट डायरेक्टर आबिद रूही यांचं स्टेटमेंट समोर आलय. इंडिगोच्या नागपूर-कोलकाता 6E812 विमानाला पक्षी धडकल्याची शक्यता आहे. आम्ही घटनेची चौकशी करत आहोत.

 

इर्मजन्सी लँडिंगमागे बर्ड हिट मुख्य कारण आहे. एविएशन इंडस्ट्रीमध्ये पक्ष्याची धडक एक गंभीर घटना मानली जाते. खासकरुन टेक-ऑफ आणि लँडिंगच्यावेळी यामुळे गंभीर धोका उत्पन्न होऊ शकतो. अनेकदा पक्ष्याच्या धडकेमुळे किंवा पक्षी इंजिनमध्ये फसल्याने टेक्निकल खराबी येते. पक्ष्याच्या धडकेमुळे विमान उड्डाण बाधित होतं.

 

याआधी 2 जूनला असं घडलेलं

 

याआधी 2 जूनला सुद्धा असच एक प्रकरण समोर आलं होतं. झारखंडची राजधानी रांची येथे जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटचं बर्ड हिटमुळे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलेलं. पक्ष्याच्या धडकेमुळे आपातकालीन लँडिंग केल्याच अधिकाऱ्यांनी सांगितलेलं. विमानातील सर्वच्या सर्व 175 प्रवासी सुरक्षित होते.

 

3000 ते 4000 फूट उंचीवर ही घटना

 

रांचीच्या बिरसा मुंडा एअरपोर्टचे संचालक आरआर मौर्य यांनी सांगितलेलं की, इंडिगोच्या एक विमानाची रांचीजवळ पक्ष्याबरोबर धडक झाली. जवळपास 3000 ते 4000 फूट उंचीवर ही घटना घडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -