,पत्नीच्या खुनाची खोटी माहिती देऊन जुना राजवाडा ठाण्यासह पोलिस नियंत्रण कक्षातील अधिकारी, पोलिसांची दिशाभूल करणार्या साळोखेनगर येथील संशयिताला राजवाडा पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतले.
विशाल विजयकुमार आळवेकर (वय 49) असे त्याचे नाव आहे.
पोलिस अंमलदार ॠषिकेश विजयकुमार ठाणेकर यांनी संशयिताविरुध्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. संशयित विशाल आळवेकर हा मोबाईलवरून डायल 112 कंट्रोल रूमला फोन करून सतत खोटी माहिती देत असतो. संशयिताने आज सायंकाळी 7.40 वाजता मोबाईलवरून पुन्हा डायल 112 कंट्रोल रूमला फोन केला. मी माझ्या पत्नीचा खून केला आहे, अशी त्याने धक्कादायक माहिती दिली.
संशयिताच्या माहितीमुळे ऐन गणेशोत्सवात अधिकार्यांसह पोलिसांची तारांबळ उडाली. चौकशीअंती संशयिताने कंट्रोल रूमला खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले. अधिकार्यांसह पोलिसांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी सरकारतर्फे ठाणेकर यांनी संशयिताविरुध्द फिर्याद दाखल केली. त्यास ताब्यात घेण्यात आल्याचे राजवाडा पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.