Saturday, September 6, 2025
Homeब्रेकिंगएकाच घरातून 2 अंत्ययात्रा ! भावाच्या मृत्यूची बातमी ऐकताच छोटा भाऊ कोसळला,...

एकाच घरातून 2 अंत्ययात्रा ! भावाच्या मृत्यूची बातमी ऐकताच छोटा भाऊ कोसळला, त्या गावात काय घडलं ?

दोन भावंडामधील प्रेमाच्या अनेक कथा आपण ऐकल्या असतूल, चित्रपटातूनही भावंडांचं प्रेम दाखवण्यात आलं. पण उत्तर प्रदेशच्या महोबामध्ये दोन भावांचं असं प्रेम दिसलं की ते वाचून तुमच्या डोळ्यांत अश्रू तरळतील. महोबात राहणाऱ्या दोन भावांमध्ये इतकं प्रेम होतं की जेव्हा मोठ्या भावाचा मृत्यू झाला, ते ऐकून धक्का बसलेल्या छोट्या भावानेही अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे एकाच घरातून दोघांची अंत्ययात्रा निघाली आणि कुटु्ंबीयांच्या दु:खाला पारावार उरला नाही, ते शोकाकुल झाले. रडून रडून त्यांची हालत बिघडली.

 

खरंतर, मोठ्या भावाचा मृत्यू आजारपणामुळे झाला, पण आपल्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून धक्का बसल्याने दुसऱ्या भावाचाही मृत्यू झाला. दोन्ही भावांचे अंतिम संस्कार एकत्र करण्यात आले.कुलपहार तहसील क्षेत्रातील सुंगिरा गावातून हे प्रकरण समोर आले आहे, जिथे राहणारे कल्लू कुशवाहा बऱ्याच काळापासून आजारी होते आणि ग्वाल्हेरनंतर सैफई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत होते. शुक्रवारी संध्याकाळी कल्लूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

कल्लूच्या मृत्यूची बातमी घरी पोहोचताच त्याचा धाकटा भाऊ प्यारे लाल कुशवाहा याला खूप धक्का बसला. प्यारेलालला त्याच्या भावाचा मृत्यू सहन झाला नाही आणि तोही मरण पावला. या घटनेमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये घबराट पसरली आणि रडून रडून त्यांची अवस्था वाईट झाली. प्यारेलाल याचं, त्याच्या मोठ्या भावावर, कल्लूवर खूप प्रेम होतं. जेव्हापासून त्याचा भाऊ मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाला तेव्हापासून तो प्रत्येक क्षणी त्याची माहिती घेत राहिला.

 

एकाच घरातून दोन अंत्ययात्रा

 

शुक्रवारी संध्याकाळी कल्लूच्या मृत्यूची बातमी कळताच प्यारे लाल याला हा धक्का सहन झाला नाही आणि त्याचाही या धक्क्यामुळे मृत्यू झाला. मृत भावाच्या मुलाने सांगितले की, काका प्यारे लाल यांना तीन मुले होती आणि दोन्ही कुटुंबे एकत्र राहत होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर चालत होता. दोन्ही भावांच्या मृत्यूबद्दल लोकांनी सांगितलं की भावांमध्ये असं प्रेम क्वचितच दिसून येते. जेव्हा दोघांच्या मृतदेहाची एकत्र अंत्ययात्रा काढण्यात आली, तेव्हा संपूर्ण गावात दुःखाची लाट परसली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -