Thursday, September 11, 2025
Homeक्रीडापृथ्वी शॉला कोर्टाने ठोठावला दंड; इन्फ्लुएन्सर सपना गिलकडून गंभीर आरोप

पृथ्वी शॉला कोर्टाने ठोठावला दंड; इन्फ्लुएन्सर सपना गिलकडून गंभीर आरोप

टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याला मुंबईच्या दिंडोशी सत्र न्यायालयाने 100 रुपयांचा दंड ठोठावला आहे. फक्त 100 रुपये.. हा आकडा वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना? तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिलच्या याचिकेवर उत्तर दाखल न केल्यामुळे न्यायालयाने हा दंड ठोठावला आहे. याआधी न्यायालयाने त्याला उत्तर दाखल करण्याची शेवटची संधी दिली होती. परंतु तरीही त्याच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया न मिळाल्याने अखेर त्याला 100 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे आणि सपना गिलने त्याच्याविरोधात याचिका का दाखल केली होती, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात..

 

नेमकं काय आहे प्रकरण?

हे संपूर्ण प्रकरण फेब्रुवारी 2023 मधलं आहे. त्यावेळी सपना गिल आणि पृथ्वी शॉ यांच्या मुंबईतील अंधेरी इथल्या एका पबमध्ये वाद झाला होता. माझ्या एका मैत्रिणीने पृथ्वी शॉकडे सेल्फी मागितला होता, परंतु त्याने नकार दिला आणि थेट तिचा फोन हिसकावून फेकून दिला, असा आरोप सपनाने केला. जेव्हा सपनाने त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पृथ्वी आणि त्याच्या मित्रांनी तिच्यावर हाच उगारून त्रास दिला, अशीही तक्रार तिने केली. यावेळी सपनाने पृथ्वीवर छेडछाडीचाही आरोप केला आहे.

 

यादरम्यान झालेल्या बाचाबाचीत सपनाने पृथ्वीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर तिला अटकदेखील करण्यात आली होती. सपनाची जामिनावर सुटका झाली आणि तिने पृथ्वी शॉ, त्याचा मित्र आशिष यादव आणि इतरांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार नोंदवली होती. सपनाने पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही. त्यानंतर तिने अंधेरी इथल्या दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली.

 

पृथ्वी शॉला ठोठावला दंड

एप्रिल 2024 मध्ये दंडाधिकारी न्यायालयाने मान्य केलं की एफआयआर नोंदवण्यास विलंब झाला आहे. परंतु सपनाचे आरोप गंभीर आहेत, त्यामुळे चौकशी होणं गरजेचं आहे. त्यानंतर न्यायालयाने सांताक्रूझ पोलिसांना कलम 202 सीआरपीसी अंतर्गत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी सुरुवातीच्या टप्प्यावरच एफआयआर नोंदवून आपली जबाबदारी पार पाडली नाही, असं म्हणत सपनाने मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशाला आव्हान दिलं.

 

पोलिसांचा हा दृष्टीकोण पीडितांवर अन्याय करणारा आहे आणि यावरून असं दिसून येतंय की पोलीस यंत्रणा योग्यरित्या काम करत नाहीये, असं सपनाचे वकील काशिफ खान म्हणाले. दिंडोशी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. आगरकर यांनी या प्रकरणात पृथ्वी शॉच्या वकिलाला उत्तर दाखव करण्यासाठी वारंवार वेळ दिला. न्यायालयाने यासंदर्भात फेब्रुवारीमध्येच सूचना दिल्या होत्या. परंतु पृथ्वी शॉने त्याकडे दुर्लक्ष केलं. 13 जून रोजी न्यायालयाने शेवटची संधी देत असल्याचं स्पष्ट केलं होतं. वारंवार संधी देऊनही उत्तर न आल्याने अखेर 9 सप्टेंबर रोजी पृथ्वी शॉला 100 रुपये दंड ठोठावून आणखी एक संधी देत असल्याचं सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -