भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी ७५ व्या वाढदिवसानिमित्त नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात ग्रामस्थांतर्फे महाअभिषेक करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे व जगभरात भारताचा नावलौकिक वाढावा, अशी प्रार्थना श्रीदत्तचरणी करण्यात आली.
यावेळी माजी सरपंच धनाजीराव जगदाळे म्हणाले, कर्तबगार नेतृत्व म्हणून मोदींच्या नेतृत्वाकडे पाहिले जाते. विकसित भारताचा नारा देऊन त्यांनी देशाला सर्व क्षेत्रात सक्षम बनविले आहे. ग्रामसमृद्धी हे ध्येय ठेऊन त्यांनी देशातील सर्व घटकांना न्याय दिला आहे. उपसरपंच रमेश मोरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील धार्मिक स्थळांसाठी विशेष योगदान दिले आहे. त्यांच्यासारख्या कणखर नेतृत्वामुळे देश आत्मनिर्भर बनला आहे. अभिषेक विधीचे पौरोहित्य अनंत पुजारी यांनी केले. यावेळी सरपंच चेतन गवळी, उपसरपंच विद्या कांबळे, तानाजी निकम, विनोद पुजारी, शिवराज जाधव, मंगेश पुजारी, रवींद्र आणुजे, सागर धनवडे, उत्तम पोवार, रमेश सुतार यांच्यासह ग्रामथ उपस्थित होते.
समृद्ध पंचायतराज अभियानाचा प्रारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाच्या पंचायतराज व्यवस्थेला बळकटी आली आहे. त्यामुळे मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरुवात केली आहे. या अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर ग्रामस्थांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून आज (दि.१७) विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.